PV Sindhu: भारताच्या १७ वर्षीय उन्नती हुडाकडूनही सिंधूची हार; चायना ओपन बॅडमिंटन, सात्त्विक-चिरागची आगेकूच
China Open2025: चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत १७ वर्षीय उन्नती हुडा हिने पी. व्ही. सिंधूचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधले. दुसरीकडे, सात्त्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठली.
चँगझोऊ : दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिला गुरुवारी चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पराभवाचा धक्का बसला. भारताच्याच १७ वर्षीय उन्नती हुडा हिने सिंधू हिचे आव्हान तीन गेममध्ये परतवून लावले आणि महिला एकेरीत पुढल्या फेरीत प्रवेश केला.