
पॅरिस : गेल्या काही महिन्यांपासून फॉर्म मिळवण्यासाठी बॅडमिंटन कोर्टवर धडपड करीत असलेल्या पी. व्ही. सिंधू हिला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पदकापासून थोडक्यासाठी वंचित रहावे लागले. इंडोनेशियाच्या पुत्री वारदानी हिने पी. व्ही. सिंधू हिचे कडवे आव्हान २१-१४, १३-२१, २१-१६ असे तीन गेममध्ये परतवून लावले व महिला एकेरीमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय खेळाडूचे आव्हान येथेच संपुष्टात आले. इंडोनेशियन खेळाडूचे मात्र पदक निश्चित झाले.