PV Sindhu defeats Bulgaria’s Kaloyana Nalbantova 23-21, 21-6 in just 39 minutes at World Badminton Championship 2025 : लक्ष्य सेन याला सोमवारी पराभवाचा धक्का बसल्यानंतर भारतासाठी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचा मंगळवारचा दिवस आनंदाचा ठरला. एकीकडे दोन वेळची ऑलिंपिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूला पराभूत केले, तर पुरुषांच्या एकेरीत एच. एस. प्रणोय यानेही प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात करीत पुढे पाऊल टाकले. भारताची पी. व्ही. सिंधू व बुल्गेरियाची कालोयाना नालबँटोवा यांच्यामध्ये लढत रंगली.