P.V Sindhu : ऑलिंपिकसाठी सिंधूला हवे नवे प्रशिक्षक

माजी ऑल इंग्लंड विजेते हाशिम यांच्यासाठी ‘साई’कडे अर्ज
PV Sindhu
PV Sindhusakal

P.V Sindhu - पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिकसाठी सुवर्णपदकापर्यंत झेप घेण्याकरिता माजी ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेते मलेशियाचे मुहम्मद हफिझ हाशिम यांचे मार्गदर्शन आपल्याला मोलाचे ठरू शकेल, असे पी. व्ही. सिंधूला वाटत आहे. परिणामी त्यांना प्रशिक्षक नेमण्यासाठी ती प्रयत्नशील आहे.

PV Sindhu
Mumbai : परिवहन विभागाच्या बढत्या, बदल्यांसाठी तारीख पे तारीख

सिंधू स्वतः दोन ऑलिंपिक पदक विजेती आहे, परंतु सुवर्णपदक मात्र तिला मिळालेले नाही. या वेळी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुहम्मद हफिझ हाशिम हे प्रशिक्षक मिळण्याकरिता मंजुरीसाठी सिंधूने क्रीडा प्राधिकरणाला (साई) पत्र लिहिले आहे.

सिंधू ही एलिट खेळाडू आहे आणि पॅरिस ऑलिंपिकसाठी भारताकडून सध्या तरी पात्र ठरलेली ती एकमेव महिला खेळाडू आहे, त्यामुळे तिची मागणी साई मान्य करेल असा विश्वास माजी राष्ट्रीय प्रशिक्षक विमल कुमार यांनी व्यक्त केला.

PV Sindhu
Mumbai : मुंबईतील पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली! राष्ट्रीय उद्यानाला ४ दिवसांत ६ हजार नागरिकांची भेट

सिंधूचा हा प्रस्ताव मिशन ऑलिंपिक सेल (एमओसी) यांच्या पुढील बैठकीत चर्चेसाठी येईल. एक राष्ट्रीय प्रशिक्षक सर्व अव्वल खेळाडूंवर एकाच वेळी लक्ष देऊ शकत नाही. प्रमुख खेळाडूंना वैयक्तिक प्रशिक्षकांची गरज लागतेच, पुरुष बॅडमिंटनमध्ये जगात सर्वोत्तम असलेल्या व्हिक्टर एक्सलसेन याच्यासाठीही वेगळे प्रशिक्षक आहेत. सिंधूनेही त्याच धर्तीवर विचार केला आहे, असे विमल कुमार यांनी सांगितले.

विमल कुमार पुढे म्हणतात, गेल्या दोनतीन वर्षांत टे सांग यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूने चांगली प्रगती केली. आता हाफिझ यांच्या मार्गदर्शनामुळे प्रगती होऊ शकेल. हाफिझ हे किती चांगले प्रशिक्षक आहेत याची मला माहिती नाही, परंतु २० वर्षांपूर्वी तो खेळाडू म्हणून सर्वोत्तम होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com