
PV Sindhu Marriage: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू ( PV sindhu) हिने नुकतंच सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून तिचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला. जेतेपद पटकावल्यानंतर तिच्या आयुष्यात आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पी व्ही सिंधू २२ डिसेंबरला उदयपूर येथे विवाह करणार आहे. हैदराबादचा उद्योगपती वेंकट दत्त साई ( Venkata Datta Sai ) यांच्यासोबत ती लग्न करणार आहे. वेंकट हे Posidex Technologiesचे कार्यकारी संचालक आहेत.