Swiss Open 2022 : पीव्ही सिंधूचा एकहाती विजय; जेतेपदावर कोरले नाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PV Sindhu

Swiss Open 2022 : पीव्ही सिंधूचा एकहाती विजय; जेतेपदावर कोरले नाव

दोन वेळा ऑलिम्पिक स्पर्धा गाजवलेल्या पीव्ही सिंधूनं (PV Sindhu ) स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे (Swiss Open 2022 ) जेतेपद पटकावले आहे. महिला एकेरीच्या अंतिम लढतीत तिने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान (Busanan Ongbamrungphan) हिला 21-16, 21-8 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. थायलंडच्या चोथ्या मानांकित बुसाननला 49 मिनिटात सरळ सेटमध्ये पराभूत करत सिंधूनं यंदाच्या हंगामातील दुसरे जेतेपद पटकावले.

याआधी भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत तिने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत नागपूरची मराठमोळी खेळाडू मालविका बनसोडचा अवघ्या 35 मिनिटांत एकतर्फी पराभव केला होता.

हेही वाचा: टीम इंडियावर तिसऱ्यांदा नो बॉलच ग्रहण; बुमराहनंतर दिप्तीची चूक

बुसानन ओंगबामरुंगफान हिच्या विरुद्ध 17 वी लढत खेळण्यासाठी सिंंधू कोर्टवर उतरली होती. सिंधूनं थायलंड खेळाडूविरुद्धचे आपले रेकॉर्ड आणखी भक्कम करत तिने 16 वा विजय नोंदवला. सिंधूनं आतापर्यंत बुसानन विरोधात एकमेव लढत गमावली आहे. 2019 मध्ये हाँगकाँग ओपन स्पर्धेत सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा: Women's World Cup : नो बॉलमुळे मिताली ब्रिगेडचं स्वप्न पुन्हा अधुरं

स्विस ओपन स्पर्धेच्या मागील हंगामात स्पॅनिश बॅडमिंटन स्टार आणि रिओ ऑलिम्पिकची गोल्ड मेडलिस्ट कॅरोलिना मारिनन हिने सिंधूला एकतर्फी पराभूत केले होते. यावेळी सिंधू पूर्णत: हतबल ठरली होती. कॅरोलिनानं 35 मिनिटांत सिंधूचा खेळ खल्लास केला होता. यंदाच्या सीझनमध्ये सिंधूनं अखेर जेतेपदावर नाव कोरण्यात यश मिळवले.

Web Title: Pv Sindhu Win Swiss Open 2022 Womens Singles Title

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BadmintonPV Sindhu
go to top