रोहित शर्माच्या निर्णयावर अश्विन भडकला; म्हणाला कौन बनेगा करोडपती सारखं... | R. Ashwin Rohit Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

R. Ashwin Rohit Sharma

R. Ashwin Rohit Sharma : रोहित शर्माच्या निर्णयावर अश्विन भडकला; म्हणाला कौन बनेगा करोडपती सारखं...

R. Ashwin Rohit Sharma : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका आज तिसऱ्या सामन्याने समाप्त होईल. भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच खिशात टाकली आहे. तिसरा वनडे सामना जिंकून रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ लंकेला व्हाईट वॉश देण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा: IND vs SL 3rd ODI LIVE : रोहित - गिलची सलामी; भारताची दमदार सुरूवात

दरम्यान, रोहित शर्माने पहिल्या वनडे सामन्यात शेवटच्या षटकात मोहम्मद शमीने श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाविरूद्धची नॉन स्ट्राईक रन आऊटची अपिल मागे घेतली. यानंतर क्रिकेट वर्तुळात, सोशल मीडियात रोहित शर्माची चांगलीच वाहवाह सुरू होती. मात्र त्याचाच संघसहकारी अश्विननेच रोहितच्या या निर्णयावर नाराजीचा सूर ओढत टीका केली.

भारताचा फिरकीपटू अश्विन म्हणाला की, 'शानका ज्यावेळी 98 धावांवर खेळत होता त्यावेळी शमीने नॉन स्ट्राईक रनआऊट करत पंचांकडे अपिल केली. रोहित शर्माने ही अपिल परत घेतली. यानंतर लोकांनी लगेचच ट्विट करायला सुरूवात केली. मी पुन्हा स्पष्ट करतोय की हा एक फलंदाजाला बाद करण्याची वैध पद्धत आहे. जर कोणी LBW किंवा झेल घेतल्याची अपिल होती तर त्यावेळी कोणीही कर्णधाराला या अपिलबाबत कौन बनेगा करोडपती सारखं तुम्ही आश्वस्त आहात की नाही असं विचारलं नसतं.'

हेही वाचा: IND vs SL 3rd ODI : टीम इंडियाची पद्मनाभस्वामी मंदिराला भेट; फोटो झाले व्हायरल

अश्विन पुढे म्हणाला, 'जर गोलंदाजाने अपिल केले तर फलंदाजाला बाद द्यायला हवे. जर खेळादा खेळाडू अपिल करतो तर त्यावेळी पंचाचे काम आहे की जर खेळाडू बाद असेल तर त्याला बाद ठरवावे.'

भारत आणि श्रीलंका यांच्यातीत तिसरा वनडे सामना तिरूवअनंतपुरम येथे होत आहे. भारताने आधीत पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली आहे.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....