
भारताचा बुद्धिबळ चॅम्पियन प्रज्ञानानंदा याचं नाव सध्या जगभरात गाजत आहे. जगज्जेता मॅग्नस कार्लसन याच्यासोबत नुकतंच त्याने फिडे विश्वचषकामध्ये उल्लेखनीय खेळी केली. यामध्ये त्याला पराभव पत्करावा लागला असला, तरी त्याच्या खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
१८ वर्षीय चेस चॅम्पियन रमेशबाबू प्रज्ञानानंदा जगभरात जिथे कुठे जातो, तिथे त्याच्या नावाबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात. अनेकांचा त्याच्या नावाचा उच्चार करताना गोंधळ उडतो. प्रज्ञानानंदाचं नाव काहीसं वेगळं आहे. भारतातही हे नाव कमी प्रमाणावर ऐकायला मिळतं. हे नाव जेव्हा इंग्रजीत लिहिलं जातं, तेव्हा त्याचं उच्चारण किंवा स्पेलिंग लिहितानाही अनेकांची गडबड उडते. याच नावाबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
काही लोकांचं म्हणणं आहे की हे नाव तमिळ ग्रंथांमधून आलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल की मराठीमध्ये त्याचं नाव प्रज्ञानानंद असेल. पण तसं नाही. या नावाच्या इंग्रजी स्पेलिंगनुसार, त्याचं नाव प्रज्ञानानंदा आहे, असं दिसत आहे. हे स्पेलिंग आहे - praggnanandhaa . यामध्ये १४ अक्षरे आहेत. बहुतांश लोकांचं म्हणणं आहे की हे नाव संस्कृतमधून आलेलं आहे. काही जणांच्या मते, हे नाव ऋग्वेदातून आलेलं आहे. प्रज्ञानानंदा हे नाव ऋग्वेदातल्या तीन महान वाक्यांवरून घेतलेलं आहे, असंही मत काही जणांनी व्यक्त केलं आहे.
काही दिवसांपूर्वी एका क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रज्ञानानंदाची बहीण वैशाली हिने सांगितलं की, तो ज्या भागात खेळण्यासाठी जातो, तिथे त्याच्या नावाची जोरदार चर्चा होते. अनेकांना त्याच्या नावाबद्दल कुतुहल वाटतं. त्याच्या नावाबद्दल अनेकजण विविध प्रश्नही विचारतात.
चांद्रयान- ३ सोबतही आहे संबंध
प्रज्ञानानंदा हे नाव कुठून आलं? तर या नावाची उत्पत्ती प्रज्ञान (प्रज्ञा) या शब्दापासून झाली असावी. याचा अर्थ बुद्धिमत्ता, शहाणपणा (Wisdom) असाही सांगितला जातो. चांद्रयान ३ च्या रोवरचं नावही प्रज्ञान असं आहे. कारण वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की हे रोवर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करेल आणि तिथून विविध प्रकारची माहिती गोळा करेल.
धार्मिक संदर्भ काय सांगतात?
या नावामागे काही धार्मिक संदर्भही आहेत. प्रज्ञानानंदाचे पालक हे कल्की देवतेला पूजतात. भगवान विष्णूच्या शेवटच्या अवतारावर त्यांची श्रद्धा आहे. त्याचे पालक आपल्या घरापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्की मंदिरामध्ये दर्शनासाठी नियमितपणे जातात. तिथल्या पुजाऱ्याने हे नाव ठेवलं असल्याची माहिती न्यूज १८ ने दिली आहे. त्याच्या पालकांनाही आधी या नावाचा अर्थ माहिती नव्हता.
प्रज्ञानानंदाचा योग्य अर्थ आहे की आपल्या बुद्धिमत्तेमुळे तेजोमय झालेला. प्रज्ञानचा एक अर्थ प्रकट ज्ञान असाही होत. भारतात सामान्य व्यक्तींची अशी नावं अगदी दुर्मिळ. पण काही धर्मगुरुंचं मात्र हे नाव निश्चितच आढळून येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.