esakal | जोकोविच अमेरिकन ओपनमधून बाहेर; नदालने कोणावर केली मात?
sakal

बोलून बातमी शोधा

Rafael Nadal beats Marin Cilic in American Open 2019

अमेरिकन ओपनमध्ये स्पेनच्या राफेल नदालने क्रोएशियाच्या मरीन सिलिचचा पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. क्ले कोर्टचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदालने सिलिचला ६-३, ३-६, ६-१,६-२ असा पराभव केला. आता नदालचा क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटिनाच्या दिएगो सचवार्तझमन याच्याशी होणार आहे. 

जोकोविच अमेरिकन ओपनमधून बाहेर; नदालने कोणावर केली मात?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपनमध्ये स्पेनच्या राफेल नदालने क्रोएशियाच्या मरीन सिलिचचा पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. क्ले कोर्टचा बादशहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदालने सिलिचला ६-३, ३-६, ६-१,६-२ असा पराभव केला. आता नदालचा क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटिनाच्या दिएगो सचवार्तझमन याच्याशी होणार आहे. 

मी खूप नशीबवान : नदाल
नदालने सिलिचचं आव्हान मोडून काढताना जबरदस्त खेळ दाखवला. नदालने दुसरा सेट ३-६ असा गमावला होता. पण त्याने सिलिचला वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही. तिसऱ्या सेटमध्ये त्याचा खेळ बहरला. तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये त्याने सलग ९ गेम्स जिंकले. पुढे सामना जिंकण्यासाठी शेवटच्या १५ पैकी १२ पॉइंट्स खिशात घातले.

सिलिचने २०१४मध्ये अमेरिकन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं. पण, त्यानंतर त्याला या स्पर्धेत समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. त्या स्पर्धेत सिलिचने सेमीफायनलमध्ये फेडररला सलग तीन सेटमध्ये मात देऊन फायनलमध्ये प्रवेश केला होता. सिलिच्या त्या खेळाची जादू नदालविरुद्धच्या सामन्यात दिसली नाही. दुसरा सेट मिळवल्यानंतर सामना बरोबरीत आला. पण नदालने आपल्या खेळाचा दर्जा उंचावत सिलिचला पुन्हा संधी दिली नाही. ‘माझ्यासाठी हा खूपच भावनिक क्षण आहे. या खेळाशी माझं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे. आठ वर्षांपूर्वी मी येथे पुन्हा खेळेन असं मला वाटलं नव्हतं. पण, मी खूप नशिबवान आहे. कारण, एकेकाळी शरिरानं साथ दिली नव्हती. तरीही आज मी इथे खेळत आहे,’ अशी प्रतिक्रिया नदालनं दिली आहे. 

जोकोविच जायबंदी
खांद्याच्या दुखापतीमुळे बेजार झालेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच यानं अमेरिकन ओपनमधून माघार घेतली आहे. नोवाक जोकोविचचा स्वित्झर्लंडच्या एस. वॉवरिंकाविरुद्ध सामना सुरू होता. या सामन्यात जोकोविचच्या खांद्याला दुखपत झाली. सामन्यात वॉवरिंकाने वर्चस्व मिळवले होते. ६-४, ७-५, २-१ अशी स्थिती असताना जोकोविचने सामना सोडून स्पर्धेतून माघार घेतली. क्वार्टर फायनलमध्ये वॉवरिंकाच सामना रशियाच्या डी. मेदवेदेशी होणार आहे. अग्रमानांकीत जोकोविचने नुकतीच विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्यान अमेरिकन ओपन स्पर्धीही जिंकण्याचे इरादे व्यक्त केले होते. पण दुदैवाने त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे.

loading image
go to top