esakal | मिलॉसकडून नदालचा पराभव
sakal

बोलून बातमी शोधा

मिलॉसकडून नदालचा पराभव

मिलॉसकडून नदालचा पराभव

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ब्रिस्बेन - स्पेनच्या रॅफेल नदालला नव्या मोसमातील पहिल्याच एटीपी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत व्हावे लागले. कॅनडाच्या मिलॉस राओनीचने त्याला 4-6, 6-3, 6-4 असे हरविले. मिलॉस हा गतविजेता आहे.

त्याने रॉजर फेडररला हरवून विजेतेपद मिळविले होते. पहिला सेट गमावल्यानंतर त्याने चिवट खेळ केला. या लढतीच्या वेळी स्टेडियम हाउसफुल होते. बहुसंख्य प्रेक्षक नदालला प्रोत्साहन देत होते, पण अखेरीस त्यांची निराशा झाली. आदा मिलॉससमोर बल्गेरियाच्या ग्रिगॉर दिमीत्रोवचे आव्हान असेल.