esakal | बार्सिलोना ओपन: नदालचा नादच खुळा; स्टीफानोसचे वाजले बारा!

बोलून बातमी शोधा

Rafael Nadal
बार्सिलोना ओपन: नदालचा नादच खुळा; स्टीफानोसचे वाजले बारा!
sakal_logo
By
टीम ई सकाळ

टेनिस जगतात दुसऱ्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने बाराव्यांदा बार्सिलोना ओपन जिंकली. त्याने पाचव्या क्रमांकावर असलेल्या ग्रीसच्या स्टीफानोस त्सित्सिपासला पराभूत केले. अंतिम सामन्यात त्याने स्टेफानोस सितसिपास (Stefanos Tsitsipas) ला 6-4, 6-7, 7-5 असे पराभूत केले. नदालने इल्या इवाश्का, केई निशिकोरी, कॅमरन नॉरी आणि पाब्लो कॅरेनो बुस्टा अगुट यांना पराभूत करत फायनल गाठली होती. यापूर्वी 2018 मध्येही बार्सिलोना ओपनच्या फायनलमध्ये नदाल वर्सेस स्टीफानोस असा सामना रंगला होता. यावेळीही नदालनेच बाजी मारली होती.

हेही वाचा: विराटला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंची IPL मधून माघार

विक्रमी विजयानंतर नदालने भावूक प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. एक वर्षानंतर घरच्या कोर्टवर आपल्या प्रेक्षकांसमोर खेळलो. त्यामुळे हा विजय माझ्यासाठी खूप मोलाचा वाटतो. स्टीफानोस उत्तम प्रतिस्पर्धी आहे, असेही तो म्हणाला. यंदाच्या वर्षी तो चांगल्या पद्धतीने खेळताना दिसतोय.

20 वेळा ग्रँडस्लॅम विजेता नदालचे कारकिर्दीतील 87 वे जेतेपद आहे. मागील वर्षी फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर त्याने मिळवलेले हे पहिले जेतेपद आहे. एटीपी 500 टूर्नामेंट जिंकल्यानंतर नदालने खास विक्रम आपल्या नावे केलाय. बारा किंवा त्यापेक्षा अधिकवेळा एकच स्पर्धा जिंकणारा नदाल हा एकमेव फलंदाज आहे. नदालचा बार्सिलोना ओपनमधील सेमीफायनल आणि फायनलमधील रेकॉर्ड हा 24-1 असा आहे. केवळ 2019 मध्ये त्याला अपयश आले होते.