Wimbledon 2019 : नाट्यमय लढतीत नदालचा विजय

वृत्तसंस्था
Friday, 5 July 2019

टेनिसस्टार रॅफेल नदाल आणि निक किरग्योस यांच्यात विंबल्डनमध्ये झालेला सामना पूर्ण नाट्यमय झाला. या साम न्यात नदालने  6-3, 3-6, 7-6 (7/5), 7-6 (7/3) असा विजय मिळवला. मात्र, या सामन्यात दोघांमध्ये चांगलीच भांडणं रंगली. निकने नदालविरुद्ध खेळताना त्याला मारण्याचा प्रयत्न करत अखिलाडूवृत्ती दाखवली तर मैदानावरील पंच डॅमेन डुमुसोईस यांच्याशीही हुज्जत घातली. 

विंबल्डन : टेनिसस्टार रॅफेल नदाल आणि निक किरग्योस यांच्यात विंबल्डनमध्ये झालेला सामना पूर्ण नाट्यमय झाला. या साम न्यात नदालने  6-3, 3-6, 7-6 (7/5), 7-6 (7/3) असा विजय मिळवला. मात्र, या सामन्यात दोघांमध्ये चांगलीच भांडणं रंगली. निकने नदालविरुद्ध खेळताना त्याला मारण्याचा प्रयत्न करत अखिलाडूवृत्ती दाखवली तर मैदानावरील पंच डॅमेन डुमुसोईस यांच्याशीही हुज्जत घातली. 

गतविजेती अँजेलिक लॉरीनविरुद्ध पराभूत

गतविजेत्या जर्मनीच्या अँजेलिक केर्बरला विंबल्डनच्या महिला एकेरीच्या दुसऱ्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. जागतिक क्रमवारीत 95 व्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या लॉरीन डेव्हिसने तिला 2-6, 6-2, 6-1 असे हरविले. 

लॉरीन पात्रता फेरीत हरली होती, पण काही वाइल्ड कार्ड दिली न गेल्यामुळे तिला लकी लुजर म्हणून प्रवेश मिळाला होता. पाचव्या मानांकित अँजेलिकने दोन मॅच पॉइंट वाचविले, पण नेटमध्ये बॅकहॅंड गेल्यानंतर तिने डोक्‍याला हात लावला. 

लॉरीन 25 वर्षांची आहे. ती म्हणाली की, मी फार आनंदी आहे. ही कामगिरी जवळपास स्वर्गीय अशीच आहे. मी ज्यासाठी कसून सराव करते त्यासाठी हे खूप काही आहे. 
दोन वेळच्या माजी विजेत्या पेट्रा क्विटोवाने क्रिस्टीना म्लाडेनोविचला 7-5, 6-2 असे हरविले. 

काल गतविजेत्या नोव्हाक जोकोविचने अमेरिकेच्या डेनिस कुड्‌ला याचा 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rafael Nadal wins against Nick Kyrgios in Wimbledon 2019