Rahul Chahar Divorce: क्रिकेटर राहुल चहरचा घटस्फोट!, भाविनक पोस्टद्वारे सोशल मीडियावर झाला व्यक्त

Indian cricketer Rahul Chahar जाणून घ्या, घटस्फोटाची माहिती देताना राहुल चहरने नेमकं काय सांगितलय?
Indian cricketer Rahul Chahar

Indian cricketer Rahul Chahar

esakal

Updated on

Rahul Chahar divorce news : भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी संघर्ष करणारा फिरकीपटू राहुल चहरचा घटस्फोट झाला आहे. त्याने पत्नी इशानी जोहरला घटस्फोट दिला आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची त्याने स्वतः पुष्टी केली आहे. आज, २० फेब्रुवारी रोजी त्याने त्याच्या घटस्फोटाबद्दल एक मोठी इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली.

चहरने लिहिले, "मी खूप लहान वयात लग्न केले, स्वतःला, माझे मूल्य किंवा मी जे जीवन घडवू इच्छित होतो ते पूर्णपणे समजून घेण्यापूर्वी. त्यानंतरची वर्षे अशी होती जी मी कधीही कल्पना केली नव्हती. माझे मागील १५ महिने कोर्टकचेऱ्यांच्या चकरा मारण्यात,  धैर्य आणि सहनशीलतेची ताकद शिकण्यात गेली आहेत."

यानंतर राहुल चहरने पुढे लिहिले की, "आज, माझ्या आयुष्यातील हा अध्याय अधिकृतपणे संपतोय. मी हा प्रश्न कायदेशीररित्या सोडवला आहे, मोठी किंमत मोजून. माझ्या आयुष्याचा हा टप्पा संपला आहे. मी हा अध्याय रागाने किंवा पश्चात्तापाने नाही तर स्पष्टतेने संपवत आहे."

Indian cricketer Rahul Chahar
Betel Leaf : पान खाल्ल्याने ‘शुगर लेव्हल’ वाढते का? जाणून घ्या, तज्ञांचे मत!

राहुल चहर आणि ईशानी जौहर यांचे लग्न ९ मार्च २०२२ रोजी झाले होते. त्यांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केले होते. त्यांचे नाते साडेतीन वर्षे टिकले. तथापि, त्यांच्या आयुष्यात सतत संघर्ष होत असल्याने त्यांनी आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com