Ricky Ponting Reaction | राहुल द्रविड कोच झाल्याचं आश्चर्य वाटलं, कारण... - पॉन्टींग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Dravid

पॉन्टींगने प्रशिक्षकपदाची ऑफर का नाकारली, त्याचंही दिलं उत्तर

राहुल द्रविड कोच झाल्याचं आश्चर्य वाटलं, कारण... - पॉन्टींग

IND vs NZ : भारतीय संघाने पहिल्या टी२० सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली. भारताकडून सूर्यकुमार यादवने दमदार अर्धशतक ठोकत संघाच्या विजयाचा पाया रचला. कर्णधार म्हणून रोहितसाठी हा विजय महत्त्वाचा होताच, पण मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांच्यासाठीही हा विजय खास ठरला. याचदरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींग याने राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक झाल्याच्या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केलं.

Ricky Ponting

Ricky Ponting

"द्रविडने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्याचं ऐकून मला तर आश्चर्यच वाटलं. युवा संघाचा प्रशिक्षक म्हणून तो समाधानी असल्याच्या खूप चर्चा मी ऐकल्या होत्या. प्रशिक्षकाला संघासोबत विविध ठिकाणी फिरावं लागतं. द्रविडची मुलं अजून लहान आहेत. त्याचा विचार करता त्याने हे पद स्वीकारलं याचं आश्चर्य वाटतं", असं रिकी पॉन्टींग एका पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाला.

rahul dravid

rahul dravid

"IPL सुरू असताना मी काही जाणकारांशी चर्चा केली होती. मुख्य प्रशिक्षकपदाबद्दल बरीच खलबतं सुरू होती. पण मला जेव्हा विचारणा झाली तेव्हा मी सर्वात आधी एक गोष्ट सांगितली होती की मला माझ्या कुटुंबापासून दूर राहून इतका वेळ देता येणार नाही. आणि हे पद स्वीकारण्याचा दुसरा अर्थ म्हणजे मला दुसऱ्या कोणत्याही स्पर्धेत किंवा IPL मध्ये कोणत्याही संघाचे प्रशिक्षकपद भूषवता येणार नाही", असेही पॉन्टींगने स्पष्ट केलं.

loading image
go to top