दुसऱ्या कसोटीपूर्वी राहुल द्रविडचे पुजाराबाबत महत्वाचे वक्तव्य| Cheteshwar Pujara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cheteshwar Pujara
दुसऱ्या कसोटीपूर्वी राहुल द्रविडचे पुजाराबाबत महत्वाचे वक्तव्य

दुसऱ्या कसोटीपूर्वी राहुल द्रविडचे पुजाराबाबत महत्वाचे वक्तव्य

जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून ( दि. ३ जानेवारी) सुरु होत आहे. भारताने पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. आजपासून सुरु होणारा दुसरा कसोटी सामना जिंकून भारत (India) मालिका विजयासाठी प्रयत्न करेल. पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. मात्र दुसऱ्या डावात फलंदाजांना चांगला खेळ करता आला नव्हता. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), विराट कोहली (Virat Kohli) आणि काही अंशी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) फेल गेले. चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नव्हता आणि दुसऱ्या डावातही त्याची गाडी १६ धावांच्या पुढे गेली नाही. चेतेश्वर पुजाराच्या या फॉर्मबाबत (Cheteshwar Pujara Form) भारताची माजी भींत आणि सध्याचे टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul dravid) आपले मत व्यक्त केले.

हेही वाचा: SA vs IND : कोहलीची प्रेस कॉन्फरन्सला दांडी; द्रविड म्हणाला...

राहुल द्रविडने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या कामगिरीबाबत भाष्य केले. राहुल द्रविड देखील चेतेश्वर पुजारा सारखा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. त्यामुळे त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे किती आव्हानात्मक असते याची जाणीव आहे.

राहुल द्रविड (Rahul dravid) पुजाराच्या फलंदाजीबद्दल पत्रकार परिषदेत म्हणाला, 'तो त्याच्या परीने चांगले करण्यासाठी भरपूर प्रयत्न करत आहे. त्यालाही जास्त धावा करणे आवडते. तुम्ही चिंतेत आहात का हा मुद्दा नाही तर तो ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो त्या क्रमांकावर फलंदाजी करणे आव्हानात्मक असते. जेव्हा पुजारा मोठ्या धावा करतो त्यावेळी भारत जिंकतो.' राहुल द्रविडने अशी प्रतिक्रिया देत एकप्रकारे चेतेश्वर पुजाराची पाठराखणच केली.

हेही वाचा: 'क्विंटन डिकॉकने आम्हाला धक्काच दिला, पण....'

चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) 2021 मध्ये 28.08 च्या सरासरीने 702 धावा केल्या आहेत. भारताकडून या वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो 5 व्या स्थानावर आहे. त्याने गेल्या वर्षात सहा अर्धशतके ठोकली आहेत. पण, 2019 पासून त्याच्या बॅठमधून अजून शतक आलेले नाही. याचबरोबर विराट कोहली देखील त्याच्या सर्वोच्च फॉर्ममध्ये नाही. तोही पहिल्या डावात चांगल्या सुरुवातीनंतर पुन्हा एकदा बाद झाला.

दुसऱ्या बाजूला पहिल्या कसोटीतच संघातील स्थान धोक्यात आलेल्या अजिंक्य रहाणेने पहिल्या सामन्यात पहिल्या डावात 48 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने 20 धावांचे योगदान दिले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top