टीम इंडियामध्ये दिनेश कार्तिकचा रोल काय असेल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Dravid
टीम इंडियामध्ये दिनेश कार्तिकचा रोल काय असेल? द्रविडने दिले उत्तर

टीम इंडियामध्ये दिनेश कार्तिकचा रोल काय असेल? द्रविडने दिले उत्तर

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या ५ सामन्यांच्या टी २० सीरीजसाठी टीम इंडियाच्या ताफ्यात विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकचे पुनरागमन झालं आहे. इतकेच नव्हे तर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही दिनेश कार्तिकची जागा पक्की झाली आहे. असे संकेत टीम इंडियाचे कोच राहुल द्रविडने दिले आहेत.

हेही वाचा: विराटने रचला इतिहास, 'दुहेरी शतक' झळकावल्यानंतर शेअर केला खास व्हिडिओ

यंदाच्या आयपीएल सीझनमधील दिनेश कार्तिकची कामगिरी पाहता त्याला धोनी नंतर टीम इंडियाला फिनिशर म्हणुन बोलले जात आहे.

नुकतंच दिनेश कार्तिकच्या भूमिकेबद्दल राहुल द्रविडने आपले मत व्यक्त केलं आहे. दिनेश कार्तिकचा रोल स्पष्ट आहे. कार्तिकने आयपीएलमध्ये संघाच्या फिनिशरची भूमिका पार पाडली होती. याच कारणास्तव दिनेश कार्तिकचे टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे.

दिनेश कार्तिक तीन वर्षांनंतर टीम इंडियात परतला आहे. 2020 आणि 2021 च्या आयपीएलमध्येही दिनेश कार्तिकला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. पण यावर्षी आरसीबीकडून खेळताना त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले. वयाच्या 37 व्या वर्षीही कार्तिकने टीम इंडियात पुनरागमन करून एक नवा आदर्श ठेवला आहे.

हेही वाचा: पांड्या टीम इंडियाच्या लिडरशिप ग्रुपमध्ये; द्रविडने काय दिले उत्तर?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचवेळी अष्टपैलू हार्दिक पांड्याने पुनरागमन केले आहे.

या संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार असून यात ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक यांचा समावेश आहे.

Web Title: Rahul Dravid Hints At Roles Of Dinesh Karthik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top