VIDEO : सूर्यानं लहानपणी नक्कीच माझी बॅटिंग बघितली नाही... द्रविडने सूर्याची खेचली | Rahul Dravid On Suryalumar Yadav IND vs SL | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Dravid On SuryaKumar Yadav

Rahul Dravid On Suryalumar Yadav : सूर्यानं लहानपणी नक्कीच माझी बॅटिंग बघितली नाही... द्रविडने सूर्याची खेचली

Rahul Dravid On SuryaKumar Yadav : श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात सूर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळी करत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. 51 चेंडूत 112 धावा ठोकून सूर्याने भारताच्या 228 धावातील जवळपास निम्म्या धावा एकट्याने केल्या. या खेळीनंतर सूर्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडने देखील सूर्याची पाठ थोपटली. मात्र यावेळी राहुल द्रविडने विनोद देखील केले. सध्या अशाच एका वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IND vs SL: जळका पांड्या! सूर्याच्या फटकेबाजीवर झाला नाराज...

तिसऱ्या टी 20 सामन्यानंतर राहुल द्रविड आणि सूर्यकुमार यादव यांची एक मुलाखत बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाईटवरून शेअर केला. यावेळी राहुल द्रविडने सूर्याची पाठ थोपटलीच याचबरोबर काही विनोद देखील केले.

राहुल द्रविड म्हणाला की, 'आता इथे माझ्यासोबत कोणतरी आहे. मला खात्री आहे की तो लहान असताना त्याने नक्कीच माझी बॅटिंग पाहिलेली नाही.' द्रविड पुढे म्हणाला, सूर्या अद्वितीय आहे. तो ज्या फॉर्ममध्ये आहे प्रत्येक वेळी मला असे वाटते की मी यापेक्षा चांगली टी 20 इनिंग पाहिलेली नाही. तो प्रत्येकवेळी यापेक्षा काहीतरी भारी करून दाखवतो.' (Sports Latest News)

हेही वाचा: Umran Malik: स्पीड गनची जादू; असा क्लीन बोल्ड केला की स्टंपने हवेत घेतली सहा वेळा गुलाटी - Video

या मुलाखतीदरम्यान राहुल द्रविडने सूर्याच्या आतापर्यंत 3 टी 20 शतकांमधील सर्वात आवडी खेळी कोणती असे विचारले. त्यावेळी यादवला याचे उत्तर देणे अवघड गेले.

यादव म्हणाला की, 'खरं तर अवघड परिस्थितीत मला फलंदाती करणे आवडते. मी अशी एक खेळी निवडू शकत नाही. मला एक खेळी निवडण्यात अडचण येत आहे. मी फक्त माझ्या खेळीचा आनंद घेतोय. जे गेले वर्षभर मी केले तेच मी यापुढेही करत राहणार आहे.'

सूर्या पुढे म्हणाला, 'कठिण परिस्थितीतून सामना खेचूण आणावा अशी अपेक्षा संघ माझ्याकडून करतो. मी कायम सामना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. जर ते माझ्यासाठी आणि संघासाठी यशस्वी ठरले तर मी आनंदी असतो.'