चॅपल यांनी द्रविडवर केला चोरीचा आरोप, काय आहे नेमकं प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Dravid and Greg Chappell

चॅपल यांनी द्रविडवर केला चोरीचा आरोप, काय आहे नेमकं प्रकरण

Greg Chappell on Rahul Dravid : राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियन ब्रेन वापरुन देशांतर्गत क्रिकेटमध्ये कायापालट घडवून आणला. याचा भारतीय राष्ट्रीय संघाला चांगला फायदा झाल्याचे दिसते, असे ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज ग्रेग चॅपल यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन संघ काहीतरी चुका करत आहे. त्यामुळे भारत (Indian Cricket Team) आणि इंग्लंडच्या (England Cricket Team) संघाने त्यांना ओव्हरटेक केले, असेही ते म्हणाले. युवा क्रिकेटमधील प्रतिभा ओळखून त्यांचा यशाचा मार्ग सुकर करण्यात भारत आणि इंग्लंडच्या संघाने ऑस्ट्रेलियाला (Australian Cricket) मागे टाकले आहे.

भारतीय संघाच्या यशाचे श्रेय त्यांनी युवांना मार्गदर्शन करणाऱ्या द्रविडला दिले. द्रविडने ऑस्ट्रेलियन ब्रेनचा वापर करुन आपल्या देशातील युवांना घडवण्याचे काम केले, असे चॅपल यांनी cricket.com.au. ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. युवा प्रतिभावंत खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचा वसा ऑस्ट्रेलियाला जपता आला नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. सध्याच्या घडीला प्रतिभावंत खेळाडू शोधणे हे ऑस्ट्रेलियासाठी मोठे चॅलेंज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: EPL : मँचेस्टर सिटी 10 वर्षांत पाचव्यांदा 'चॅम्पियन'

भारतीय संघातील गुणवत्ता सुधारल्याचे सांगताना त्यांनी भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचा दाखला दिला. ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारतीय संघात तीन-चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. भारतीय संघाची अ टीम वाटणाऱ्या संघाने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानात नमवल्याची आठवणही त्यांनी करुन दिली.

हेही वाचा: IPL 2021 : उर्वरित मॅचसाठी इंग्लंडमधून वाजली धोक्याची घंटा

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात दिमाखदार विजय नोंदवला होता. भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर राहुल द्रविड ट्रेंडिंग झाला होता. त्यावेळी भारतीय संघाच्या विजयात राहुल द्रविडचा हात आहे, अशी चर्चा रंगली होती. द्रविडने भारत अ आणि 19 वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला रिषभ पंत, मयांक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि शार्दुल ठाकूर हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी कामगिरी करत आहेत.

Rahul Dravid picked Australian brains to create solid domestic structure in india

Web Title: Rahul Dravid Picked Australian Brains To Create Solid Domestic Structure In India Says Greg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top