esakal | IND vs SL: द्रविड गुरूजी लंका दौऱ्यात 'या' क्रिकेटपटूवर नाराज
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Dravid

IND vs SL: द्रविड गुरूजी लंका दौऱ्यात 'या' क्रिकेटपटूवर नाराज

sakal_logo
By
विराज भागवत

भारतील संघातील काही खेळाडू संधी मिळूनही चांगला खेळ करू शकले नाहीत

कोलंबो: भारतीय क्रिकेट संघाला टी२० मालिकेत श्रीलंकेविरोधात २-१ ने पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याच्या संपर्कातील अनेक महत्त्वाचे खेळाडू क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे १-०ने आघाडीवर असलेल्या भारतीय संघाला शेवटचे दोन सामने उपलब्ध असलेल्या खेळाडूंसोबत खेळावे लागले. त्याचा फटका भारताला बसला आणि मालिका गमवावी लागली. या मालिकेबाबत बोलताना द्रविडने एका विशिष्ट खेळाडूबद्दल महत्त्वाचे मत व्यक्त केले. (Rahul Dravid Says this Team India cricketer must be disappointed with himself in Sri Lanka Tour)

हेही वाचा: महेंद्रसिंह धोनीचा 'सुपरकूल' मेकओव्हर; चाहते पडले प्रेमात

"श्रीलंका दौऱ्यावर जे काही घडलं ते खरं सांगायचं तर विचार करण्यापलीकडे होतं. संघातील अनेक खेळाडूंना आयत्या वेळी बाहेर बसवावे लागले. जे खेळाडू खेळले त्यात संजू सॅमसनसारख्या खेळाडूकडून साऱ्यांनाच अपेक्षा होत्या. पण संजूला सहज खेळता येईल अशा प्रकराची पिचेस लंकेत नव्हती. संजूला वन डे सामन्यात एकदा संधी मिळाली. त्यात त्याने ४६ धावांची खेळी केली. टी२० मध्ये त्याला संधी मिळूनसुद्धा चांगला खेळ करता आला नाही. जेव्हा संजू सॅमसन स्वत: या दौऱ्याबाबत विचार करेल तेव्हा तो स्वत:सुद्धा आपल्या कामगिरीवर नाराज असेल असा माझा विश्वास आहे. पण असं असलं तरी केवळ संजूच नव्हे तर या नव्या दमाच्या सर्वच खेळाडूंवर आपण थोडासा विश्वास दाखवला पाहिजे आणि त्यांना वेळ दिला पाहिजे. असं केलं तरच ते चांगली कामगिरी करू शकतील", अशा शब्दात द्रविडने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Sanju-Samson

Sanju-Samson

हेही वाचा: तू मॅच नव्हे सर्वांची मनं जिंकलीस...!

भारताचा खेळाडू कृणाल पांड्या पॉझिटिव्ह झाल्यामुळे संघातील अनेक जण क्वारंटाईन झाले. त्यामुळे भारतीय संघ केवळ ५ फलंदाज आणि ६ गोलंदाजांसह मैदानात उतरला. त्यातही ५ फलंदाजांनी अत्यंत खराब खेळ केला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक नाबाद २३ धावा केल्या. भारताने केवळ ८१ धावा केल्या. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने १५ षटकांतच ३ बाद ८२ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

loading image
go to top