भडकलेल्या वृद्धीमानच्या वक्तव्यावर द्रविडचे 'कूल' उत्तर

Rahul Dravid Statement After Wriddhiman Saha revealed classified conversation
Rahul Dravid Statement After Wriddhiman Saha revealed classified conversation esakal

भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आलेल्या वृद्धीमान साहाने (Wriddhiman Saha) बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly), संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि निवडसमितीबद्दल स्फोटक वक्तव्य केली होती. त्यामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली होती. आता वृद्धीमान साहाच्या राहुल द्रविड यांनी निवृत्तीचा सल्ला दिल्याच्या वक्तव्यावर खुद्द राहुल द्रविडनेच प्रतिक्रिया दिली आहे. त्याने साहाच्या वक्तव्याने आपण दुःखी झालो नसल्याचे सांगिते. ते म्हणाले की प्रशिक्षक आणि खेळाडूमधील अत्यंत गोपनीय संवाद (Classified Conversation) वृद्धीमान साहाने उघड केली. पण, वृद्धीमान साहाला त्याच्या संघातील स्थानाबद्दलची खरी माहिती देण्याचाच हा प्रयत्न होता असे द्रविड म्हणाला. (Rahul Dravid Statement After Wriddhiman Saha revealed classified conversation)

Rahul Dravid Statement After Wriddhiman Saha revealed classified conversation
रोहित युगात पाहुण्यांना 'व्हाईट वॉश' देण्याचा 'सिलसिला'

राहुल द्रविड वृद्धीमान साहाच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाला की, 'मला त्याच्या वक्तव्याने दुःख झालेले नाही. माझ्या मनात वृद्धीमान साहाबद्दल, त्याने भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल खूप आदर आहे. मी त्याच्याशी झालेल्या संवादाचा उद्येश एकच होता की त्याला खरं जाणून घेण्याचा अधिकार आहे.'

द्रविड पुढे म्हणाला, 'मी खेळाडूंशी सातत्याने संवाद (Conversation With Players) साधत असतो. प्रत्येक खेळाडू माझ्या मताशी सहमत असेलच असे नाही. अशा पद्धतीने गोष्टी घडत नाहीत. तुम्हाला खेळाडूबद्दल अवघड विषयांवर देखील बोलावे लागते. याचा अर्थ तुम्ही त्याच्याशी संवाद न साधता गोष्टी लपवून ठेवाव्यात असा होत नाही. ज्यावेळी अंतिम 11 चा संघ निवडला जातो त्याआधी मी खेळाडूंबरोबर संभाषण करतो. त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यास कायम प्रयत्न करतो. त्यांना संघात का स्थान मिळेले नाही, याबाबत त्यांना माहिती देणे गरजेचे असते. खेळाडू नाराज होणे आणि दुःखी होणे हे स्वाभाविक आहे.'

Rahul Dravid Statement After Wriddhiman Saha revealed classified conversation
IND vs WI : ऋतूराजला कुणाची नजर लागली?

राहुल द्रविडने सांगितले की, ऋषभ पंतने (Rishabh Pant) संघातील पहिल्या पसंतीचा विकेट किपर - बॅट्समन म्हणून आपली जागा पक्की केली आहे. आता त्याचा बॅक अप म्हणून एखादा युवा विकेटकिपर (Kona Bharat) तयार करण्याची आमची कल्पना आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही वृद्धीमानचा आदर करत नाही.

द्रविड म्हणाला की, 'माझ्यासाठी खेळाडूंबरोबर अशी अवघड विषयांवरची चर्चा न करणे हा अत्यंत सोपा पर्याय आहे. पण, मी हे करणार नाही. मला असे वाटते की एका क्षणाला ते अशी चर्चा झाल्याचा आदर करतील.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com