Sa vs Ind : द.आफ्रिका दौऱ्यापूर्वी द्रविडबाबत BCCI चा मोठा निर्णय! बदलला संपूर्ण कोचिंग स्टाफ; कोण आहे नवीन कोच?

Rahul Dravid
Rahul Dravidsakal

South Africa vs India ODI series : आता सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. जिथे त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली. मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दूसरा दक्षिण आफ्रिकेने तर तिसरा भारतीय संघाने जिंकला होता. त्यामुळे मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. टीम इंडिया आता रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका सुरू करणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने सर्वानाच आश्चर्याचा धक्का देणारा निर्णय घेतला.

Rahul Dravid
Mumbai Indians : कर्णधारपदावरून रोहित शर्माला हटवल्यानंतर फॅन्स संतापले! मुंबई इंडियन्सचे लाखो फॉलोवर्स झाले कमी

Cricbuzz या वेबसाइटनुसार, राहुल द्रविडला कसोटी मालिकेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचे आहे, त्यामुळे त्याने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयनेही द्रविडची विनंती मान्य केली आहे.

राहूल द्रविडच्या अनुपस्थितीत सीतांशु कोटक हे वनडे मालिकेत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक अजय रात्रा नव्या कोचिंग स्टाफमध्ये सामील झाला आहे. जो क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहे, तर राजीव दत्त गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका निभावतील.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 17 डिसेंबर रोजी जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळला जाईल.

एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाची कमान केएल राहुलकडे असेल. एकदिवसीय मालिकेनंतर, भारतीय संघ यजमानांशी 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भिडणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरपासून न्यू लँड्समध्ये तर दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com