Rahul Dravid First Love | "द्रविड माझं पहिलं प्रेम"; हॉट बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"द्रविड माझं पहिलं प्रेम"; हॉट बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा

"मी क्रिकेट पाहणं सोडलं होतं, पण आता मी..."

"द्रविड माझं पहिलं प्रेम"; हॉट बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा

Gentleman's Game हे क्रिकेटला मिळालेलं नाव सार्थ करणारे काही भारतीय खेळाडू होऊन गेले. त्यापैकी एक म्हणजे राहुल द्रविड. द्रविडने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत शक्य त्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. कर्णधारपासून ते किपर पर्यंत सर्वच क्षेत्रात त्याने आपलं योगदान दिले. निवृत्त झाल्यानंतरही त्याने आधी युवा भारतीय संघाला क्रिकेटचे धडे दिले. आता विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला प्रशिक्षण देण्यात तो व्यस्त आहे. राहुल द्रविडचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. बॉलिवूडचे अभिनेता-अभिनेत्रीदेखील त्याचे चाहते आहेत. मात्र द्रविड हे आपलं पहिलं प्रेम होतं, असा खुलासा एका बॉलिवूड अभिनेत्रीने केला.

"मी जेव्हा लहान होते, तेव्हा मला क्रिकेटची फारशी आवड नव्हती. माझा भाऊ क्रिकेट खेळायचा. टीव्हीवर लागलेला क्रिकेटचा सामनाही आम्ही पाहायचो. पण राहुल द्रविडला खेळताना पाहाणं मला सुरूवातीपासूनच आवडायचं. जेव्हा तो हळूहळू संघातून बाहेर गेला, त्यानंतर मी खरंच क्रिकेट पाहणं सोडून दिलं होतं. कारण माझं पहिलं प्रेम राहुल द्रविड होता. तो आता क्रिकेटच्या मैदानात प्रशिक्षक म्हणून परतला आहे. त्यामुळे मी आता पुन्हा एकदा क्रिकेट बघायला सुरूवात करणार आहे", असा खुलासा हॉट अभिनेत्री रिचा चड्ढा हिने केला.

रिचा चड्ढा गेल्या दोन-तीन वर्षांपासून क्रिकेटशी काही अंशी जोडली गेली आहे. इनसाईड एज या बेव सिरिजमध्ये तिची मुख्य भूमिका आहे.

रिचाने इनसाईड एजमध्ये एका अभिनेत्रीची भूमिका निभावली आहे. त्या भूमिकेत असतानाच ती एका क्रिकेट संघाची मालकीण असल्याचे दाखवण्यात आले आहे.

इनसाईड एज या बेव सिरिजचे दोन सिझन क्रिकेट चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे ३ डिसेंबरला या सिरिजचा तिसरा सिझनदेखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताला पहिलं यश

विश्वचषक स्पर्धेचा उपविजेता न्यूझीलंडला भारतीय संघाने टी२० मालिकेत ३-० ने पराभूत केले. भारताने तिसरा सामना ७३ धावांनी जिंकत मालिका खिशात घातली. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर पहिल्याच मालिकेत भारताला निर्भेळ यश मिळाले. त्यानंतर द्रविडने भारतीय खेळाडूंना विशेष सल्ला दिला. "हा मालिका विजय नक्कीच खास आहे. संपूर्ण मालिकेत आम्ही चांगली कामगिरी केली. माझ्या पहिल्याच मालिकेत इतकं यश मिळालं ही गोष्ट चांगली आहे, पण तरीही आम्हाला आमचे पाय जमिनीवर ठेवावे लागतील. या मालिकाविजयाची हवा डोक्यात जाऊ न देता आपण पुढे नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत", असा सल्ला द्रविडने दिला.

loading image
go to top