
द. अफ्रिकेच्या माजी कर्णधाराने टीम इंडियाच्या खेळाडूला दाखवला आरसा
आयपीएल २०२२ मध्ये चॅम्पियन संघ ठरलेल्या गुजरात संघाचा राहुल तेवतिया गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बीसीसीआयने आयर्लंड विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या टी२० सीरीजमधून तेवतियाला वगळले. त्यानंतर त्याने ट्विट करत नाराजी व्यक्त केली. त्याचे ट्विट सध्या चर्चेत आले आहे. तेवतियाच्या या व्हायरल होणाऱ्या ट्विटवर साऊथ अफ्रिकेच्या माजी कर्णधाराने प्रतिक्रिया व्यक्त करत तेवतियाचे कान टोचले आहेत. माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने खेळाडूला ट्विटरऐवजी कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा: बर्मिंगहॅम टेस्ट हारली तर टीम इंडियाचे मोठे नुकसान, ICC पॉईंट टेबलमध्ये...
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना भारतीय संघाबद्दल भाष्य केले. 'भारतात हे खूप अवघड आहे. कारण खेळाडूंमध्ये खूप प्रतिभा आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी ऑस्ट्रेलियातील परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्यातील बहुतांश खेळाडू निवडले असतील.
खरंतर, ट्विटरऐवजी कामगिरीवर लक्ष केंद्रित करा असे मी म्हणेन. पुढच्या वेळी तुमची वेळ येईल, तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकणार नाही याची खात्री करा. असा सल्ला ग्रॅमी स्मिथने अप्रत्यक्षपणे तेवातियाला दिला.
हेही वाचा: IND vs ENG: विराट कोहली खेळतो फुटबॉल, तर रोहित गाळतोय नेटमध्ये घाम
तेवातियाचे काय होते ट्विट?
आयर्लंड विरुद्ध खेळवण्यात येणाऱ्या टी२० सीरीजमधून तेवतियाला वगळण्यात आल्यानंतर आशा दुखावल्या गेल्या अशी पोस्ट ट्विटरवर शेअर केली होती. 29 वर्षीय राहुल तेवतियाला गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी संघात घेण्यात आले होते, परंतु दुखापतीमुळे तो पदार्पण करू शकला नाही. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये गुजरात टायटन्ससाठी फिनिशर म्हणून तेवतिया खूप यशस्वी ठरला. यादरम्यान तेवतियाने, 16 सामन्यांत 147.61 च्या स्ट्राईक रेटने 217 धावा केल्या. संपूर्ण आयपीएल हंगामात तेवातियाने केवळ सहा षटके टाकली आणि एकही विकेट घेण्यात अपयशी ठरला.
Web Title: Rahul Tewatia Should Focus On Game Not Twitter Graeme Smith Gujarat Titans Ind Vs Eng Test 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..