

Railway Wrestlers represent states: येत्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे रेल्वे आपल्या खेळाडूंना त्यांच्या राज्यातून खेळण्यास परवानगी दिली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय रेल्वे क्रीडा प्रमोशन मंडळाने घेतला आहे.
रेल्वे क्रीडा मंडळाचा संघ हा कोणत्याही खेळातील प्रमुख संघ समजला जातो. कुस्तीसारख्या खेळांत तर रेल्वे संघाचे वर्चस्व असते. अनेक दिग्गज मल्ल रेल्वेतून खेळलेले आहेत. यंदाची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा ६ डिसेंबरपासून बंगळूर येथे सुरू होत आहे.