IND vs WI : पहिल्या सामन्यात पावसाचाच खेळ 

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात गुरुवारी पावसानेच अधिक काळ खेळ केला.

प्रोव्हिडन्स (गयाना) - वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात गुरुवारी पावसानेच अधिक काळ खेळ केला.

सुरवातीच्या पावसाच्या खेळीने "टॉस'ला उशीर झाला. भारताने टॉस जिंकल्यावर वेस्ट इंडिजला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामना 43 षटकांचा करण्यात आला. त्यानंतर डावातील 5.3 षटके होत नाही तोवर पुन्हा पाऊस आला.

तेव्हा विंडीजच्या बिनबाद 9 धावा होत्या. पाऊस थांबल्यावर खराब मैदानामुळे सामना लांबला. तीन वेळी पाहणी केल्यावर सामना 34 षटकांचा करण्यात आला. खेळाला सुरवात झाल्यावर लुईसने बरसायला सुरवात केली. पण, गेल बाद झाला.

लुईस आणखी बरसण्याच्या मूडमध्ये असतानाच पुन्हा पाऊस आला आणि खेळ थांबला तेव्हा विंडीजने 13 षटकांत 1 बाद 54 धावा केल्या होत्या. लुईस 36 चेंडूंत, 2 चौकार, 3 षटकारांसह 40,तर शई होप 6 धावांवर खेळत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in the first ODI IND vs WI