Rajashree Swain : ओडिसातील बेपत्ता झालेल्या महिला क्रिकेटपटूचा मृतदेह सापडला जंगलात

Rajashree Swain Odisha Women Cricketer
Rajashree Swain Odisha Women Cricketeresakal

Rajashree Swain Odisha Women Cricketer : ओडिसामधील 22 वर्षाची महिला क्रिकेपटू राजश्री स्वैनचा मृतदेह कटक शहराजवळील जंगलात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. राजश्री ही 11 जानेवारीपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह गुरूडीजाटिया जंगलात आढळला. याबाबतची माहिती डीसीपी पिनाक मिश्रा यांनी दिली.

Rajashree Swain Odisha Women Cricketer
India Vs Spain HWC 2023 : भारताने फोडला विजयाचा नारळ! स्पेनचा पहिल्याच सामन्यात धुव्वा

राजश्रीच्या प्रशिक्षकांनी कटकमधील मंगलबाग पोलिस ठाण्यात गुरूवारी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान आज तिचा मृतदेह गुरूडीजाटिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत जंगलात सापडला. त्यानंतर पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची केस दाखल करून घेतली आहे.

पोलिसांनी अजून राजश्रीच्या मृत्यू कसा झाला याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र राजश्रीच्या कुटुंबियांनी तिचा खून झाला असल्याचा आरोप केला आहे. राजश्रीच्या शरिरावर आणि डोळ्याजवळ जखम झाल्याचे दिसत आहे असा दावा कुटुंबियांनी केला आहे.

राजश्रीच्या कुटुंबियांनी सांगितले की ओडिशा क्रिकेट असोसिएशनने पदुच्चेरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी बजराकाबाटी येथे 25 महिला क्रिकेटपटूंचा कॅम्प आयोजित केला होता. या कॅम्पमध्ये राजश्रीचा देखील समावेश होता. संपूर्ण संघ हॉटेलमध्ये रहात होता.

Rajashree Swain Odisha Women Cricketer
Sania Mirza : ग्रँडस्लॅम विजयाचा 'षटकार' मारणारी सानिया टेनिस कोर्टला करणार अलविदा!

पोलिसांनी सांगितले की, ओडिसा राज्य महिला क्रिकेट संघाची घोषणा ही 10 जानेवारी रोजी झाली होती. मात्र राजश्री स्वैनला अंतिम संघात स्थान मिळवण्यात अपयश आले. पुढच्याच दिवशी सर्व खेळाडू तांगी भागातील क्रिकेट मैदनावर सरावासाठी गेल्या होत्या. मात्र राजश्रीने तिच्या कोचला ती पुरी येथे वडिलांना भेटण्यासाठी जात असल्याचे सांगितले.

(Sports Latest News)

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com