esakal | राजस्थान ठरले 'रॉयल', कोरोनाग्रस्तांसाठी दिले साडे सात कोटी

बोलून बातमी शोधा

RR
राजस्थान ठरले 'रॉयल', कोरोनाग्रस्तांसाठी दिले साडे सात कोटी
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

देशातील कोरोनाजन्य परिस्थितीत इंडियन प्रीमियर लीगमधील खेळाडूंनी मदतीचा हात पुढे केल्यानंतर आता फ्रँचायझी टीमकडूनही मदतीचे पाउल उचलण्यात आले आहे. राजस्थान रॉयल्सने देशातील कोरोनासाठी मदत म्हणून आपल्या फाउंडेशनच्यावतीने 7.5 कोटींची मदत दिलीये. राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने एका निवेदनाच्या माध्यमातून यासंदर्भातील घोषणा केली. देशात कोरोनामुळे प्रभावित झालेल्या लोकांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी आम्ही आर्थिक स्वरुपात मदत देण्याचा निर्णय घेतलाय. संघातील खेळाडू, टीमचे मालक आणि टीम व्यवस्थापक यांच्याकडून निधी गोळा करण्यात आला आहे. रॉयल राजस्थान फांउडेशन (RRF) आणि ब्रिटिश एशियाई ट्रस्टच्या माध्यमातून कोरोनाची मदत निधी देण्यात आल्याची माहिती फ्रँचायझींनी दिली.

हेही वाचा: IPL 2021 : मेनन यांची स्पर्धेतून माघार; ऑस्ट्रेलियन अंपायरवर नामुष्की

राजस्थान रॉयल्सपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्स याने कोरोनाजन्य संकटाच्या काळात ऑक्सिजन खरेदीसाठी 50 हजार ऑस्ट्रेलियन डॉलरच्या स्वरुपात आर्थिक मदत केली होती. आयपीएल स्पर्धेत कॉमेंट्री पॅनेलमध्ये दिसणाऱ्या ब्रेटलीने देखील बिटकॉईनच्या स्वरुपात 41 लाख रुपयांची मदत केली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हरभजन सिंग याने पुण्यातील कोरोनाग्रस्तांसाठी मोबाईल व्हॅन दिली होती. याशिवाय अन्य आजी माजी क्रिकेटर्स यापूर्वी कोरोनाच्या संकटात आर्थिक स्वरुपात तसेच अन्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून उपयुक्त वस्तूंचे वाटप करताना पाहायला मिळाले आहे.