esakal | युवा क्रिकेटरच्या वडिलांची कोरोना विरुद्धची झुंज अपयशी
sakal

बोलून बातमी शोधा

chetan sakariya

युवा क्रिकेटरच्या वडिलांची कोरोना विरुद्धची झुंज अपयशी

sakal_logo
By
सुशांत जाधव

देशात कोरोनाचा (Covid 19 in India) कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाची दहशत कायम असून अनेकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळताना दिसलेल्या चेतन सकारिया (chetan sakariya) या युवा क्रिकेटर्सच्या वडिलांचेही रविवारी कोरोनाने निधन झाले. (chetan sakariya father passes away due covid19) राजस्थान रॉयल्सच्या (RR) अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन यासंदर्भाती माहिती देण्यात आलीये. चेतन सकारियाचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.

राजस्थान रॉयल्सने ट्विटमध्ये लिहिलंय की, चेतन सकारियाचे वडील कांजीभाई सकारिया याचा कोरोना विरुद्धचा लढा अपयशी ठरला. सध्याच्या दु:खद परिस्थितीत आम्ही चेतन सकारिया आणि त्याच्या कुटुंबियांच्यासोबत आहोत. त्यांना आवश्यक ती मदत आमच्याकडून दिली जाईल, असे फ्रेंचायझी संघाने म्हटले आहे.

हेही वाचा: पंतची मॅच्युरिटी आणखी वाढली; कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात

आयपीएलच्या 14 व्या हंगामात युवा चेतन सकारियाने आपल्या कामगिरीने सर्वांनाच आश्चयचकित करुन सोडले होते. स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा संघ पाँइट टेबलमध्ये तळाला राहिला असला तरी चेतन सकारियाने फिल्डिंग आणि बॉलिंगमधील लक्षवेधी कामगिरी करुन दाखवली होती. 7 मॅचमध्ये त्याने 7 विकेट घेतल्या. यात एमएस धोनी, सुरेश रैना, केएल राहुल सारख्या लोकप्रिय क्रिकेटर्सच्या विकेटचा समावेश होता.

हेही वाचा: कोरोनाच्या लढ्यासाठी 'विरुष्का' मैदानात

काही दिवसांपूर्वीच राजस्थान रॉयल्सने चेतन सकारियाला त्याच्या मानधनातील काही हिस्सा दिला होता. यासंदर्भात चेतन सकारियाने फ्रेंचायझी संघाचे आभार मानले होते. गरजेच्या वेळी फ्रेचायझींनी पैसे दिले. वडिलांच्या उपचारासाठी पैशांची गरज होती. घरी पैसे पाठवले आहेत, असे चेतन सकारियाने म्हटले होते. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर घरी पोहचल्यालर चेतन सकारियाला वडिलांना कोरोना झाल्याचे समजले. पीपीई किट घालून चेतन सकारिया कोरोनाशी झुंज देणाऱ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटला होता.