esakal | पंतची मॅच्युरिटी आणखी वाढली; कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant

पंतची मॅच्युरिटी आणखी वाढली; कोरोनाग्रस्तांसाठी मदतीचा हात

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय संघात आपली छबी हळूहळू गडद करणाऱ्या रिषभ पंतने (Rishabh Pant) शनिवार मोठी घोषणा केली. कोरोनाच्या संकट काळात फ्रंटलाईन वर्करचे त्याने आभार मानले असून सध्याच्या कठीण परिस्थितीत अडकलेल्या लोकांसाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. कोरोनाग्रस्त लोकांसाठी ऑक्सिजन सिलिंडर, बेड, कोविड रिलिफ किट आणि अन्य उपकरण मिळवून देण्यासाठी एका फाउंडेशनच्या माध्यमातून तो आर्थिक मदत करणार आहे.

हेही वाचा: ... म्हणून हार्दिक पांड्याला टीम इंडियातून डच्चू

हेमकुंत फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांना आर्थिक मदत करण्याची घोषणा पंतने केलीये. यासंदर्भात त्याने एक ट्विट केले आहे. कोरोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांसाठी हेमकुंत फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत करत आहे. ही संस्था देशभरातील कोरोनाग्रस्तांना आवश्यक ऑक्सिजन सिलिंडर, बेड, कोविड रिलिफ किट आणि अन्य साहित्य पुरवण्याचे काम करते. ज्या संस्था ग्रामीण भागासह नॉन मेट्रो सिटीतील लोकांच्या मदतीचे कार्य करत आहेत, त्यांना सहकार्य करण्यास इच्छूक आहे, असेही पंतने म्हटले आहे. मोठ्या शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात आणि नॉन मेट्रो सीटीमध्ये आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे, असा उल्लेखही त्याने आपल्या ट्विटमध्ये केलाय.

हेही वाचा: 46 वर्षानंतर पारसी क्रिकेटरला मिळाली टीम इंडियात संधी

यंदाच्या आयपीएलच्या 14 व्या हंगामात रिषभ पंतकडे अनावधानाने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करण्याची वेळ आली होती. श्रेयस अय्यरने खांद्याच्या दुखापतीमूळे स्पर्धेतून माघार घेतली. या कठीण परिस्थितीत पंतची कर्णधार म्हणून निवड झाली. त्याने टीम मॅनेजमेंटने आपल्यावर टाकलेली जबाबदारी योग्य असल्याचे दाखवून दिले. बॅटिंगसोबत नेतृत्वातही परिपक्व झाल्याचा नमुना त्याने स्पर्धेतील सामन्यादरम्यान दाखवून दिला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली होती. देशाच्या कानाकोपऱ्यात कोविड -19 मुळे संघर्ष करणाऱ्या प्रत्येकापर्यंत आरोग्य सेवा पोहचवण्यासाठी पुढे यावे, असा संदेशही दिला आहे.

rishabh pant announced financial help those have suffered through covid 19