Rameshbabu Praggnanandhaa : प्रज्ञानंदचा नाकामुरावर विजय

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेची भारताच्या प्रज्ञानंदने विजयाने सांगता केली. त्याने अखेरच्या सामन्यात अमेरिकेच्या हिराकू नाकामुरा याचा पराभव केला; पण त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मँग्नस कार्लसनने ही स्पर्धा जिंकली.
Rameshbabu Praggnanandhaa
Rameshbabu Praggnanandhaasakal

स्टॅव्हेंजर (नॉर्वे) : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेची भारताच्या प्रज्ञानंदने विजयाने सांगता केली. त्याने अखेरच्या सामन्यात अमेरिकेच्या हिराकू नाकामुरा याचा पराभव केला; पण त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मँग्नस कार्लसनने ही स्पर्धा जिंकली.

विजेतेपदासह कार्लसनने ६५ हजार डॉलरची कमाई केली. त्याने स्पर्धेत एकूण १७.५ गुण मिळवले. प्रज्ञानंदकडून अंतिम डावात पराभूत झालेला नाकामुला १५.५ गुणांसह दुसरा आला; तर तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या प्रज्ञानंदचे १४.५ गुण झाले.

तिसरा क्रमांक मिळाला असला, तरी प्रज्ञानंदसाठी ही स्पर्धा यशस्वी ठरली आहे. त्याने स्पर्धेत रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या पहिल्या तीन खेळाडूंना पराभूत केले आहे. त्यात कार्लसनचाही समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com