रमीझ राजा म्हणजे नुसत्याच तोंडाच्या वाफा; वर्ल्डकप बहिष्कारावरून ICC समोर घातले लोटांगण : Ramiz Raja PCB | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ramiz raja assures icc officials pakistan board pcb no decision taken on boycotting odi world cup in india cricket news

रमीझ राजा म्हणजे नुसत्याच तोंडाच्या वाफा; वर्ल्डकप बहिष्कारावरून ICC समोर घातले लोटांगण

Ramiz Raja PCB : पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रमीझने अलीकडच्या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला अनेक धमक्या दिल्या होत्या आणि कदाचित त्याला त्याची शिक्षाही भोगावी लागत आहे. रमीझने PCB चेअरमन म्हणून उत्तम काम केले आहे. त्याला अशाप्रकारे अचानक काढून टाकणे सर्वांच्याच समजण्यापलीकडे आहे. त्यांच्या जागी नजम सेठी यांची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा: Kuldeep Yadav : अविश्वसनीय! सौम्य शब्द वापरतोय नाही तर... सुनिल गावसकर टीम इंडियावर जाम भडकले

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नजम सेठी यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहिद आफ्रिदी आणि सना मीर या माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या वर्षी एप्रिलमध्ये इम्रान खान यांचे पंतप्रधानपद गमावले तेव्हापासूनच राजा यांना धोका निर्माण झाला होता. सप्टेंबर 2021 मध्ये इम्रान यांनीच रमीझ राजा यांची बोर्डाचे 26 वे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केली होती.

हेही वाचा: IPL 2023 Auction : आपल्या फिरकीवर पाकला नाचवणाऱ्या 'या' 18 वर्षाच्या खेळाडूवर पडू शकतो पैशाचा पाऊस

रमीझ राजा अध्यक्ष असताना पाकिस्तान क्रिकेटला खूप फायदा झाला. पाकिस्तानने सलग दोन टी-20 विश्वचषकांमध्ये चांगली कामगिरी केली. एकादा उपांत्य फेरी आणि दूसऱ्यादा फायनल खेळली आहे. याशिवाय आशिया कपचा अंतिम सामनाही खेळला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारखे संघ पाकिस्तानात जाऊन कसोटी मालिका खेळले आहेत. न्यूझीलंडचा संघ लवकरच पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. संघाच्या सततच्या यशादरम्यान राजाने एकच गोष्ट केली आहे ज्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला. रमीझ राजाने पुढच्या वर्षीचा एकदिवसीय विश्वचषक सोडण्याची धमकीही दिली होती.