इम्रान खान बोल्ड झाल्याने रमिझ राजांचा अर्ध्यावर डाव मोडणार?

Ramiz Raja May Resign From Pakistan Cricket Board Chairmen post
Ramiz Raja May Resign From Pakistan Cricket Board Chairmen postesakal

कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) चेअरमन रमिझ राजा (Ramiz Raja) हे आपल्या पदाचा राजीनामा (Resignation) देण्याचा विचार करत आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. इम्रान खान (Imran Khan) यांची पंतप्रधान पदावरून गच्छंती झाल्यानंतर रमिझ राजांची 'एकदम से हालात बदल गये! जज्बात बदल गयें!' अशी परिस्थिती झाली आहे. रमिझ राजा हे इम्रान खान पाकिस्तानचा कर्णधार होता त्यावेळी संघात होते. सध्या ते आयसीसीच्या बैठकीसाठी दुबईत आहेत.

Ramiz Raja May Resign From Pakistan Cricket Board Chairmen post
'महाग' झालेल्या श्रीलंकेचे आशियाई कप यजमानपद धोक्यात?

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'इम्रान खान यांनी विनंती केली होती म्हणून रमिझ राजा यांनी पीसीबीचे चेअरमन पद स्विकारले होते. रमिझ राजा हे इम्रान खानच्या नेतृत्वात देखील खेळले होते. त्यामुळे रमिझ राजा यांच्या मनात इम्रान खान यांच्याप्रती आदर आहे. रमिझ राजा यांची एक समालोचक म्हणून उत्तम कारकिर्द आहे. त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट होते. पण, इम्रान खान यांनी विनंती केल्यानंतर रमिझ राजा पीसीबीचे चेअरमन होण्यास तयार झाले होते. त्यांनी इम्रान खानच्या शब्दाखातर आपल्या सर्व समालोचकाचे करार बाजूला ठेवले होते.'

Ramiz Raja May Resign From Pakistan Cricket Board Chairmen post
रवी शास्त्री टॉसपूर्वीच धोनीवर जोरात का ओरडले होते?

सूत्रांनी पुढे सांगितले की, 'रमिझ राजा पीसीबीचे चेअरमन होण्यासाठी एका अटीवर तयार झाले होते. ती अट म्हणजे ते फक्त इम्रान खान पंतप्रधान असेपर्यंतच पीसीबीचे चेअरमन राहतील.' आता इम्रान खान पंतप्रधान पदावरून पायउतार झाले आहेत. त्यामुळे रमिझ राजा चेअरमन पदावर कायम राहतील याची शाश्वती नाही. जर त्यांना नव्या पंतप्रधानांनी पदावर राहण्याची विनंती केली तर राजा राजीनामा देण्याची शक्यता कमी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com