रवी शास्त्री टॉसपूर्वीच धोनीवर जोरात का ओरडले होते? | Ravi Shatri Shouted on MS Dhoni during Asia cup final | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Shatri Shouted on MS Dhoni during Asia cup final  against Pakistan

रवी शास्त्री टॉसपूर्वीच धोनीवर जोरात का ओरडले होते?

नवी दिल्ली : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) हे कॉमेंटरी बॉक्समध्ये परतले आहेत. दरम्यान रवी शास्त्री कॉमेटरी बॉक्समधून भारतीय संघासोबत असताना घडलेले किस्से सांगत आहेत. रवी शास्त्रींनी अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. आता त्यांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसोबत (MS Dhoni) घडलेला एक किस्सा सांगितला. धोनी हा फुटबॉल (Football) प्रेमी आहे. तो क्रिकेट खेळण्यापूर्वी फुटबॉलच खेळत होता. जरी धोनी भारतीय क्रिकेट संघात असला तरी वॉर्म अपसाठी तो फुटबॉल खेळणेच पसंत करत होता.

हेही वाचा: बक्षीस रक्कमेबाबत आयोजकांची टोलवाटोलवी; पृथ्वीराजसाठी शिवेंद्रराजे सरसावले

आशिया कप फायलन सामन्यापूर्वी देखील महेंद्रसिंह धोनी टॉसला जाण्यापूर्वी वॉर्म अप करताना फुटबॉल खेळत होता. दरम्यान, रवी शास्त्रींनी हे पाहिले आणि त्याच्यावर जोरात ओरडले. रवी शास्त्रींनी सांगितले की आयुष्यात पहिल्यांदाच मी इतक्या जोरात कोणावर ओरडलो असेन. रवी शास्त्री ओरडण्याचे कारण म्हणजे मैदानावर दव पडले होते आणि मैदान निसरडे झाले होते. रवी शास्त्रींना वाटत होते की यावर जर फुटबॉल खेळला तर धोनीला दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रवी शास्त्री धोनीवर जोरात ओरडले. त्यांनी धोनीला फुटबॉल खेळणे त्वरित थांबवण्यास सांगितले.

हेही वाचा: IPL सामन्यात रोहितला भेटण्याचा नाद नडला; सुरक्षाकडे तोडणारा अटक

या किस्स्याबाबत सांगताना रवी शास्त्री म्हणाले की, 'धोनीला फुटबॉल खेळणे खूप आवडते. तो खूप जोशात फुटबॉल खेळत असतो. ज्यावेळी तुम्ही मैदानाबाहेरून पाहत असता त्यावेळी तुम्हाला त्याचा जोश पाहून भिती वाटते. मला आशिया कपच्या फायनलदरम्यान घडलेला किस्सा आठवतोय. मैदानावर दव पडले होते. त्यावेळी मी फुटबॉल खेळणे बंद करा असे जोरात ओरडलो. मी माझ्या आयुष्यात कधीही इतक्या जोरात ओरडलो नव्हतो. मात्र पाकिस्तान सारख्या संघाविरूद्ध तुम्ही तुमचा सर्वात चांगला खेळाडू गमावू शकत नाही. मात्र धोनीला फुटबॉल पासून दूर ठेवणे जवळपास अश्यक आहे.'

महेंद्रसिंह धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असून तो यंदाच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व देखील करत नाहीये. त्यातच चेन्नई सुपर किंग्जने हंगामताली सुरूवातीचे चारही सामने गमावले आहे.

Web Title: Ravi Shatri Shouted On Ms Dhoni During Asia Cup Final Against Pakistan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top