Ranji Trophy : भूपेन, तनुषच्या अर्धशतकाने मुंबईला सावरले; अजिंक्य रहाणे, तुषार बिहारविरुद्धच्या लढतीला मुकले

रणजी करंडक : मुंबईच्या फलंदाजांना बिहारविरुद्ध लढतीच्या पहिल्या दिवशी उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही.
ranji trophy 2024 match update ajinkya rahane and tushar deshpande opener injured health issue
ranji trophy 2024 match update ajinkya rahane and tushar deshpande opener injured health issuesakal

पाटना : सर्वाधिक वेळा रणजी विजेत्या ठरलेल्या मुंबई क्रिकेट संघाला यंदाच्या रणजी मोसमातील सलामीच्याच लढतीआधी मोठा धक्का बसला. कर्णधार अजिंक्य रहाणे व वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे हे अनुक्रमे मानेची दुखापत व छातीतील इनफेक्शनमुळे बिहारविरुद्धच्या एलिट ब गटातील लढतीत मुंबईचे प्रतिनिधित्व करू शकले नाहीत.

मुंबईच्या फलंदाजांना बिहारविरुद्ध लढतीच्या पहिल्या दिवशी उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. भूपेन लालवानी (६५ धावा), सुवेद पारकर (५० धावा) व तनुष कोटीयन (५० धावा) यांनी झळकावलेल्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर मुंबईला पहिल्या दिवसअखेरीस ९ बाद २३५ धावा फटकावता आल्या.

बिहारने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. बिहारच्या वीरप्रताप सिंग याने प्रभावी कामगिरी केली. भूपेन लालवानीने ६५ धावांची, सुवेद पारकर व तनुष कोटीयन यांनी प्रत्येकी ५० धावांची खेळी साकारली. त्यामुळे मुंबईला ९ बाद २३५ धावा उभारता आल्या. वीरप्रतापने ३२ धावा देत चार फलंदाज बाद केले. साकीबुल गणी व हिमांशू सिंग यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

धवलला विश्रांती?

मुंबईचा अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी याला बिहारविरुद्धच्या लढतीत विश्रांती देण्यात आली. मुंबई क्रिकेट संघटनेच्या सूत्रांकडून याप्रसंगी सांगण्यात आले. या वेळी मात्र एक प्रश्‍न निर्माण होतो की, धवलला विश्रांती द्यावयाची होती, तर त्याला पाटना येथे का घेऊन गेले?

संक्षिप्त धावफलक ः मुंबई - पहिला डाव ९ बाद २३५ धावा (भूपेन लालवानी ६५, सुवेद पारकर ५०, शिवम दुबे ४१, तनुष कोटीयन ५०, वीरप्रताप सिंग ४/३२) वि. बिहार.

सरावाचा अभाव

मुंबई - बिहार यांच्यामधील रणजीचा सलामीचा सामना पाटना येथील मोईन उल हक स्टेडियमवर पार पडतोय. सलगच्या धुक्यांमुळे मुंबईचा संघ पाटना येथे उशिरा पोहोचला. मुंबईचा संघ बुधवारी संध्याकाळी येथे पोहोचला. त्यामुळे त्यांना सरावासाठी फक्त एकच दिवस मिळाला. गुरुवारी त्यांना सराव करता आला. एकूणच काय तर मुंबईच्या खेळाडूंना पुरेसा सराव मिळाला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com