Ranji Trophy 2024 : जगदीशनचं IPL फ्रेंचायजींना सडेतोड उत्तर; ठोकलं नाबाद द्विशतक

Ranji Trophy 2024 N Jagadeesan
Ranji Trophy 2024 N Jagadeesanesakal

Ranji Trophy 2024 N Jagadeesan : दुबईत झालेल्या आयपीएल 2024 च्या लिलावात तमिळनाडूच्या एन जगदीशनवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला होता. मात्र आयपीएलमध्ये त्याच्याकडे फ्रेंचायजींनी साफ दुर्लक्ष केलं.

एन जगदीशन आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात होता. मात्र त्याला फार संधी मिळाली नाही. यापूर्वी तो चेन्नई सुपर किंग्जमध्ये देखील होती. आता याच एन जगदिशनने रणजी ट्रॉफी 2024 च्या हंगामात मोठा धमाका केला आहे. तमिळनाडूकडून खेळणाऱ्या एन जगदीशनने रेल्वेविरूद्ध नाबाद द्विशतक ठोकले.

Ranji Trophy 2024 N Jagadeesan
Ayodhya Ram Mandir Inauguration : विराट पोहचला अयोध्येत? हरभजनही Video शेअर करत म्हणाला...

रणजी ट्रॉफी 2024 च्या ग्रुप सी मधील सामन्यात जगदीशनने 245 धावांची नाबाद खेळी केली. त्याने आपल्या या खेळीत 25 चौोकार आणि 4 षटकार देखील लगावले. जगदीशनच्या द्विशतकाच्या जोरावर तमिळनाडूने पहिल्या डावात 489 धावांचा डोंगर उभा केला.

तमिळनाडूच्या या अवाढव्य धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या रेल्वेने पहिल्या डावात कच खालली. त्यांचा पहिला डाव 246 धावात संपुष्टात आला. तमिळनाडूने रेल्वेला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात देखील रेल्वेला फार काही चांगली फलंदाजी करता आली नाही.

Ranji Trophy 2024 N Jagadeesan
Ind vs Eng : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेआधी संघात मोठा बदल! 'या' दिग्गज खेळाडूची अचानक ताफ्यात एन्ट्री

दुसऱ्या डावात रेल्वेचा संपूर्ण संघ 114 धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. तमिळनाडूने हा सामना एक डाव आणि 129 धावांनी जिंकला. सामन्याचा मानकरी म्हणून एन जगदीशनचीच निवड करण्यात आली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com