
Team India: 'मला क्रिकेट खेळू द्या...'; मृत्यूपूर्वी भारतीय गोलंदाजाने वडिलांना लिहिले होते पत्र
काही दिवसांपूर्वी भारताने एक तेजस्वी वेगवान गोलंदाज गमावला. रणजी क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज सिद्धार्थ शर्माचे वयाच्या 28 वर्षी निधन झाले आहे. सिद्धार्थ शर्माने इडन गार्डन्सवर रणजी ट्रॉफी सामन्यात आपल्या संघाचा हिमाचल प्रदेशचा पराभव टाळला होता.
बंगालविरूद्ध सिद्धार्थने दोन्ही डावात एकूण 7 विकेट घेतल्या होत्या. सिद्धार्थ त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच 5 विकेट क्लबमध्ये सामील झाला होता, परंतु या सामन्यानंतर तो पुन्हा मैदानात उतरू शकला नाही.
हेही वाचा: IND vs SL Video : कोहलीचा फॅन आला मैदानात अन् सुर्यकुमार झाला फोटोग्राफर
28 वर्षीय सिद्धार्थ अचानक आजारी पडला. त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र तो मृत्यूला मात देऊ शकला नाही. सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडले, परंतु जेव्हा त्याचे शेवटचे शब्द सर्वांना कळले तेव्हा हृदय आणखीनच तुटले.
सिद्धार्थचा जुना मित्र आणि त्याचा हिमाचल संघातील सहकारी प्रशांत चोप्राने त्याचे शेवटचे शब्द सांगितले, जे ऐकून कोणाच्याही डोळ्यातून अश्रू थांबणार नाहीत. प्रशांत म्हणाला की सिद्धार्थचे वडील सैन्यात होते आणि सुरुवातीला त्याला क्रिकेट खेळू दिले नाही.
हेही वाचा: Yuvraj Singh: ODI क्रिकेटची होणार एक्झिट? युवराज सिंगने व्यक्त केली गंभीर चिंता
प्रशांत पुढे म्हणाला की, सिद्धार्थ आयसीयूमध्ये असताना त्याला नीट बोलताही येत नव्हते. म्हणूनच त्याने नर्सकडून एक पेपर मागितला आणि वडिलांना लिहिले की, मला क्रिकेट खेळण्यापासून रोखू नका. मला खेळू द्या स्पोर्ट्स स्टारच्या म्हणण्यानुसार, प्रशांतने सांगितले की आमचे मॅनेजर तिथे होते आणि जेव्हा त्यांनी आम्हाला याबद्दल सांगितले तेव्हा आम्हाला आमचे अश्रू आनावर झाले.