Ruturaj Gaikwad: तब्बल २४ चौकार अन् ८ षटकार! मात्र ऋतुराजचे द्विशतक पाच धावांनी हुकले

ऋतुराज गायकवाडचा शानदार फॉर्म रणजी करंडकातील तमिळनाडूविरुद्धच्या लढतीत कायम राहिला मात्र...
Ruturaj Gaikwad
Ruturaj Gaikwad

Ranji Trophy Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडचा शानदार फॉर्म रणजी करंडकातील तमिळनाडूविरुद्धच्या लढतीत कायम राहिला; मात्र त्याचे द्विशतक अवघ्या पाच धावांनी हुकले. त्याने १९५ धावांची देदीप्यमान खेळी साकारल्यामुळे महाराष्ट्राला एलिटमधील ब गटाच्या लढतीत पहिल्या डावात ४४६ धावा फटकावता आल्या. तमिळनाडूने दुसऱ्या दिवसअखेरीस ४ बाद २६७ धावा केल्या असून आता त्यांचा संघ १७९ धावांनी पिछाडीवर आहे.

Ruturaj Gaikwad
Maharashtra Kesari: माउली जमदाडेला पराभवाचा धक्का! पुण्याच्या प्रतीक जगतापला सुवर्णपदक


महाराष्ट्राने ६ बाद ३५० या धावसंख्येवरून गुरुवारी पुढे खेळायला सुरुवात केली. संदीप वॉरियरने अझीम काझीला ८८ धावांवर बाद केले. त्यानंतर ऋतुराजने एकाकी किल्ला लढवला. त्याने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन महाराष्ट्राला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

Ruturaj Gaikwad
IND vs SL: दुसऱ्या ODI मध्ये श्रीलंका करणार पलटवार! जाणून घ्या सामना कुठे पाहता येणार 'फ्री'

ऋतुराजने १८४ चेंडूंमध्ये २४ चौकार व ८ षटकारांसह १९५ धावांची छान खेळी केली. तो द्विशतक झळकावणार असे वाटत असतानाच अश्‍विन क्रीस्टच्या गोलंदाजीवर तो नारायण जगदीशनकरवी झेलबाद झाला. तमिळनाडूकडून संदीप वॉरियरने १०५ धावा देत तीन फलंदाज बाद केले.

महाराष्ट्राचा पहिला डाव आटोपल्यानंतर तमिळनाडूने दुसऱ्या दिवसअखेरीस ४ बाद २६७ धावा केल्या. नारायण जगदीशन याने ११ चौकार व १ षटकारासह ७७ धावांची खेळी केली. बाबा इंद्रजीत ४७ धावांवर बाद झाला. आता प्रदोश पॉल १० चौकारांसह ७४ धावांवर; तर विजय शंकर पाच चौकारांसह ४१ धावांवर खेळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com