Ranji Trophy : मुंबईचा सलामीला बोनस गुणासह विजय! पुढच्या सामन्यात श्रेयस, शार्दुल ठाकूर खेळण्याची शक्यता

Ranji Trophy : मुंबईचा सलामीला बोनस गुणासह विजय! पुढच्या सामन्यात श्रेयस, शार्दुल ठाकूर खेळण्याची शक्यता

Ranji Trophy Mumbai beat Bihar : अंधुक प्रकाशाच्या पाठशिवणीत शक्य झालेल्या सामन्यात मुंबईने बिहारच एक डाव आणि ५१ धावांनी पराभव केला आणि यंदाच्या रणजी मोसमाची शानदार विजयाने सुरुवात केली. या विजयात डावाच्या विजयामुळे बोनस गुणाचाही फायदा झाला.

Ranji Trophy : मुंबईचा सलामीला बोनस गुणासह विजय! पुढच्या सामन्यात श्रेयस, शार्दुल ठाकूर खेळण्याची शक्यता
Mohammed Shami : शमीने वाढवले भारताचे टेन्शन! दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींमधून बाहेर?

दरोरोज सकाळी अंधुक प्रकाशामुळे खेळ उशिरा सुरू व्हायचा आणि सायंकाळी याच कारणामुळे खेळ लवकर थांबायचा, त्यामुळे चार दिवसांत १५६ .२ षटकांचाच खेळ शक्य झाला. आज चौथ्या दिवशी मुंबईला निर्णायक विजयासाठी बिहारचे चार फलंदाज बाद करण्याची गरज होती, परंतु सकाळी सूर्यप्रकाश पुरेसा नसल्यामुळे खेळ सुरू होत नव्हता. अखेर दुपारी खेळ सुरू झाल्यावर बिहारचे उरलेले चार फलंदाज मुंबईने नऊ धावांत बाद केले.

मुंबईचा अष्टपैलू शिवम दुबेने १० धावांच चार रॉस्टन डायसने ३५ धावांत ३ विकेट मिळवल्या. मोहित अवस्थी, तनुश कोटियान आणि कर्णधार शम्स मुलानी यांनी प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले.मुंबईचा ब गटात समावेश आहे. सात गुणांसह त्यांनी चंडीगडपेक्षा चांगले कोशंट असल्यामुळे पहिले स्थान मिळवले. चंडीगडनेही बोनस गुणांसह विजय मिळवल्यामुळे त्यांचेही सात गुण आहेत.

Ranji Trophy : मुंबईचा सलामीला बोनस गुणासह विजय! पुढच्या सामन्यात श्रेयस, शार्दुल ठाकूर खेळण्याची शक्यता
Franz Beckenbauer : फुटबॉल विश्वात पसरली शोककळा; महान जर्मन खेळाडूचे निधन

मुंबईचा पुढचा सामना आंध्र प्रदेशविरुद्ध शुक्रवारपासून मुंबईत सुरू होणार आहे. मान दुखावल्यामुळे बिहारविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणे खेळू शकला नव्हता. आंध्रविरुद्धच्या लढतीसाठी तो तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवड झालेली नाही, त्यामुळे ते मुंबईच्या या रणजी सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.

श्रेययला तर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेची या रणजी लढतीतून सराव करता येईल.अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी शिवम दुबेची भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे, त्यामुळे तो आंध्रविरुद्धच्या सामन्यात उपलब्ध नसेल.

संक्षिप्त धावफलक ः मुंबई, पहिला डाव ः २५१. बिहार, पहिला डाव ः १०० आणि दुसरा डाव १०० (शरमन निगरोध ४०, बिपीन सौरभ ३०, रॉस्टन डायस ७.१-१-३५-३, शिवम दुबे ११-७-१०-४)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com