Mumbai Cricket Team : धोनीचा पठ्ठ्या बनला मुंबईचा उपकर्णधार! दमदार कामगिरीनंतर मिळाली मोठी जबाबदारी

Shivam Dubey Ranji Trophy 2024 : शिवम दुबे याची मुंबई क्रिकेट संघाच्या नवीन उपकर्णधारपदी नियुक्ती
Shivam Dubey Ranji Trophy 2024 marathi news
Shivam Dubey Ranji Trophy 2024 marathi newssakal

Ranji Trophy Shivam Dube Mumbai Vice Captain : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार अष्टपैलू शिवम दुबे जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याची मुंबई क्रिकेट संघाच्या नवीन उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निवडकर्त्यांनी मंगळवारी कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत शिवम दुबेला संघाची उपकर्णधारपदी धुरा दिली आहे. मुंबईचा नियमित उपकर्णधार शम्स मुलाणी याची इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या अनधिकृत कसोटीत भारत अ संघाकडून खेळण्यासाठी निवड झाल्यामुळे शिवम दुबेला बढती करण्यात आली आहे.

Shivam Dubey Ranji Trophy 2024 marathi news
IND vs ENG : विराट कोहलीने आईमुळे कसोटी मालिकेतून घेतली माघार...; काय आहे व्हायरल बातमीमागील सत्य?

शिवम दुबेने सोमवारी उत्तर प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात तीन विकेट्स घेण्याव्यतिरिक्त 117 धावांची तुफानी खेळी खेळली. मुंबईने त्या सामन्यात उत्तर प्रदेशचा दोन गडी राखून पराभव केला.

मुंबईचे मुख्य निवडकर्ता राजू कुलकर्णी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “त्याने या हंगामात मुंबई आणि टीम इंडियासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. आणि त्याची योग्यता सिद्ध केली आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेटने हे एक पाऊल उचलले.

रहाणेला यूपी सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे तो अंतिम दिवशी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला नव्हता. तो या सामन्यासाठी तंदुरुस्त असेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, अष्टपैलू सूर्यांश शेडगे याला रणजी ट्रॉफी कॉलअपसह मुंबई U23 संघासाठी त्याच्या उत्कृष्ट फॉर्मसाठी पुरस्कृत करण्यात आले. शेडगेने U23 कर्नल सीके नायडू सामन्यात हरियाणाविरुद्ध मुंबईच्या पहिल्या डावात 133 चेंडूत 168 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याने 63 चेंडूत 95 धावांची नाबाद खेळी केली.

भारताचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू शार्दुल ठाकूर अजूनही घोट्याच्या दुखापतीतून सावरलेला नाही. ऑक्टोबर 2017 मध्ये मुंबईसाठी शेवटचा रणजी सामना खेळलेला डावखुरा फिरकी गोलंदाज आदित्य धुमाळ स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला परत बोलावण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com