Sandeep Lamichhane : बलात्काराचा आरोप असलेल्या लामिछानेविरूद्ध इंटरपोलची नोटिस? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape Accused Sandeep Lamichhane Nepal Police initiates a process to issue an Interpol warrant

Sandeep Lamichhane : बलात्काराचा आरोप असलेल्या लामिछानेविरूद्ध इंटरपोलची नोटिस?

Sandeep Lamichhane : नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र ज्यावेळी त्याच्यावर हे आरोप झाले त्यावेळी तो कॅरेबियन प्रीमियर लीग खेळण्यासाठी वेस्ट इंडीजला गेला होता. आता नेपाळ पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी इंटरपोल वॉरंटसंबंधीची प्रक्रिया सुरू करत आहेत. यामुळे संदीप लामिछानेने पुन्हा एखदा फेसबुकवरून संवाद साधत योग्य वेळी नेपाळमध्ये येणार असल्याचे सांगितले. (Rape Accused Sandeep Lamichhane Nepal Police initiates a process to issue an Interpol warrant)

हेही वाचा: Dinesh Karthik : रोहितच्या डोक्यात DK फिट! पंतचा चेहरा पडला

संदीप लामिछानविरूद्ध काठमांडू पोलिसांनी अटक वॉरंट जारी केले आहे. याला आता 19 दिवस होत आले. दरम्यान, इंटरपोलची प्रक्रिया सुरू होणार म्हटल्यावर संदीप लामिछाने फेसबुकवरून लोकांच्या समोर आला. लामिछाने म्हणाला की, 'वयाच्या 16 वर्षी मला राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो. थोडे कष्ट करून हे मिळवता येत नाही. मी कायम नेपाळचे नाव क्रिकेट जगतात उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे. माझ्या कष्टाच्या जोरावर मी नेपाळचे नाव प्रसिद्ध करू शकलो याचा मला अभिमान आहे.' ज्यावेळी त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे आरोप झाले त्यावेळी देखील त्याने फेसबुकवरून आपली बाजू मांडली होती.

लामिछाने पुढे म्हणाला, 'बलात्काराच्या चुकीच्या आरोपावरून माझ्याविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे हे आता माहिती झालं. यामुळे माझ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील परिणाम झाला आहे. या सर्वाचा माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला असून दुसरीकडे मला शारीरिक आजारपण देखील सतावत आहे. त्यामुळे मी स्वतःला थोडे दिवस विलगीकरणात ठेवणार आहे.'

हेही वाचा: Axar Patel :आम्हाला वाटलं जडेजा नाही आता... खुद्द कांगारूंच्या प्रशिक्षकाने बापूची पाठ थोपटली

संदीपने तो नेपाळमध्ये कधी परतणार हे देखील सांगितले. तो म्हणाला की, चुकीच्या आरोपामुळे मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचलो होतो. डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे मी नॉर्मल होत आहे. माझी प्रकृती हळूहळू सुधारत आहे. मी लवकरात लवकर नेपाळमध्ये परतून या चुकीच्या आरोपांविरूद्ध माझी बाजू मांडणार आहे.' विशेष म्हणजे जेव्हापासून संदीपवर बलात्काराचा आरोप झाला आहे तेव्हापासून नेपाळ क्रिकेट असोसिएशन आणि नेपाळ पोलीस यांचा दोघांचाही त्याच्याशी संपर्क होत नाहीये.

टॅग्स :Cricketnepalrape news