Afghanistan Earthquake: सर्व काही गमावलेल्यांसाठी राशिद खानची भावनिक पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rashid khan shared afghanistan earthquake

Afghanistan Earthquake: सर्व काही गमावलेल्यांसाठी राशिद खानची भावनिक पोस्ट

एक दिवसापूर्वी अफगाणिस्तानमध्ये आलेल्या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. रात्री उशिरा झालेल्या भूकंपात सुमारे एक हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 1500 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 6.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे अफगाणिस्तानमधील 3 हजारांहून अधिक पक्की घरे जमीनदोस्त झाली आहेत.

हेही वाचा: रणजी ट्रॉफीत DRS साठी बीसीसीआयकडे पैसा नाही?

अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे लोकांना अडचणींचा सामना करायला लागत आहे. या कठीण काळात जगभरातील देश अफगाणिस्तानच्या मदतीसाठी पुढे आले आहे. अफगाणिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू राशिद खान यानेही या कठीण काळात अफगाणिस्तानच्या लोकांना मदतीचा हात पुढे केला आहे. भूकंपात सर्वस्व गमावलेल्या निष्पाप मुलीचा फोटो राशिद खानने ट्विटरवर शेअर केला आहे.

हेही वाचा: IND vs LEIC : बुमरा, पुजारा अन् पंत टीम इंडियाविरूद्धच थोपटणार दंड

राशिद खानने हा फोटो ट्विटर शेअर करत लिहिले की, ही छोटी मुलगी तिच्या कुटुंबातील कोणीही जिवंत नाही. भूकंपामुळे अनेक घरांची पडझड झाली असून दुर्गम भागात अजूनही लोक ढिगाऱ्याखाली गाडले आहेत. अशा परिस्थितीत मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की, लोकांना शक्य ती मदत करा. रशीद स्वतःही पीडितांसाठी निधी गोळा करत आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडीओ संदेशही जारी केला होता.

भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी तालिबान सरकारने 1अब्ज अफगाणी रुपये जारी केले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून शोक व्यक्त केला आहे आणि अफगाणिस्तानला मानवतावादी मदत देऊ केली आहे. पाकिस्तान, जपान आणि दक्षिण कोरियासारख्या इतर देशांनीही मदतीचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Rashid Khan Shared Picture Of Girl Who Lost All Family Afghanistan Earthquake Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top