Ravi Bishnoi : आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या खेळाडूलाच सूर्यानं दिला डच्चू

Ravi Bishnoi
Ravi Bishnoi esakal

Ravi Bishnoi : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी 20 सामना आज सेंट जॉर्ज पार्क येथे सुरू झाला. मात्र नाणेफेकीनंतर भारताने आपल्या संघाची घोषणा केली अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

कर्णधार सूर्यकुमार यादवने जाहीर केलेल्या संघात रवी बिश्नोईला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळवता आली नाही. भारतीय संघाने आजच्या सामन्यात रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव या दोन फरकीपटूंना खेळवण्याचा निर्णय घेतला.

Ravi Bishnoi
Surya Kumar Yadav : धोनीलाही टाकलं मागं; कर्णधार सूर्यानं रोहितलाही जे जमलं नाही ते करून दाखवलं

दुसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. माक्ररमचा ढगाळ वातावरणाचा फायदा उचलण्याचा मानस होता. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीवेळी आपल्या प्लेईंग 11 सांगितली.

ऋतुराज गायकवाड हा आजरपणामुळे आजचा सामना खेळणार नाहीये. त्याच्या ऐवजी शुभमन गिल हा यशस्वी जयस्वालसोबत सलामीला येईल. विकेटकिपर म्हणून इशान किशनच्या ऐवजी जितेश शर्माला संधी देण्यात आली आहे.

याचबरोबर संघात परतलेल्या रविंद्र जडेजाला खेळण्याची संधी मिळावी यासाठी रवी बिश्नोईच्या जागी त्याला संघात स्थान मिळाले. त्याच्या जोडीला कुलदीप यादव देखील दुसरा फिरकी गोलंदाज म्हणून संघात आहे.

Ravi Bishnoi
Ravi Bishnoi : आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या खेळाडूलाच सूर्यानं दिला डच्चू

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com