
CWG 2022 : रवी दहियाचा विजयी शड्डू! कुस्तीत सुवर्णाचा चौकार
Commonwealth Games 2022 : भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने पुरूष 57 किलो वजनी फ्रीस्टाईल गटात सुवर्ण पदक पटकावले. त्याने नायजेरियाच्या एबिकेनेनिमो वेल्सनचा 10 - 0 असा पराभव केला. भारताचे हे यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील कुस्तीतील चौथे तर एकूण 10 वे सुवर्ण पदक आहे. रवी कुमार दहियाची ही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा होती त्याने पहिल्याच स्पर्धेत फायनल पर्यंत धडक मारली होती.
रवी दहियाने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ करत नायजेरियाच्या कुस्तीपट्टूवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याला संधी मिळताच रवी दहियाने गटरेज डाव खेळत पहिल्या फेरीत 8 गुण मिळवले. त्यानंतर त्याने दुसऱ्या सत्रात उरलेले दोन गुण मिळवत तांत्रिक सरसतेवर सामना 10 - 0 असा जिंकला.
हेही वाचा: CWG 2022 : पिछाडी भरून काढत पूजा गेहलोतने जिंकले कांस्य पदक
भारताच्या पूजा गेहलोतने स्कॉटलँडच्या ख्रिस्टलेचा 12 - 2 असा पराभव करत महिला 50 किलो फ्रीस्टाईलमध्ये कांस्य पदक पटकावले. कुस्तीमधून भारताला मिळालेले हे दुसरे कांस्य पदक आहे. दिल्लीची पूजा ही पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत खेळत होती. भारताने कुस्तीत आतापर्यंत चार सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण 11 पदके पटकवाली आहेत.
Web Title: Ravi Kumar Dahiya Won Gold Medal In 57 Kg Freestyle Wrestling In Commonwealth Games 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..