esakal | उगाच माझ्या नावानं बिल फाडू नका; शास्त्रींनी मौन सोडलं
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Shastri

उगाच माझ्या नावानं बिल फाडू नका; शास्त्रींनी मौन सोडलं

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर (Manchester Test Cancelled) याचे खापर अनेकांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर फोडले. ब्रिटन प्रसारमाध्यमांपासून ते भारतीय चाहत्यांपर्यंत सर्वांनीच रवी शास्त्रींना ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले. यावर आता शास्त्रींनी मौन सोडले आहे.

लंडनमध्ये त्यांनी आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामुळे टीम इंडियाच्या 'बायो-बबल'मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. हे आरोप शास्त्रींनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. टीम इंडियाच्या ताफ्यातील कोरोनाचा शिरकाव आणि पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम याचा काहीही संबंध नाही, असे शास्त्रींनी म्हटले आहे.

मिड-डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये शास्त्री म्हणाले की, लंडन येथे 1 सप्टेंबरमध्ये आयोजित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामुळे कोरोनाची लागण झाली याला कोणताही आधार नाही. लंडनमध्ये कोणतेही निर्बंध नाहीत. सर्व काही खुले आहे. त्यामुळे पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातून कोरोना संक्रमण झाले असे म्हणने आणि त्याचा संबंध मँचेस्टर कसोटी रद्द झाल्याशी जोडणे चुकीचे आहे, असे शास्त्रींनी म्हटले आहे.

हेही वाचा: वर्षाची बंदी काही महिन्यात उठली; कोरोना नियम मोडणारे वर्ल्ड कप खेळणार

बीसीसीआयनेही व्यक्त केली होती नाराजी

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर 1 सप्टेंबर रोजी लंडन येथील एका हॉटेलमध्ये रवी शास्त्री यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘स्टार गेजिंग: द प्लेयर्स इन माय लाइफ इन लंडन’ नावाचे रवी शास्त्री यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले होते. या कार्यक्रमात रवी शास्त्री यांच्यासह टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि संघातील काही खेळाडूही सहभागी होते.

हेही वाचा: IPL 2021: आला रे... सचिन देणार अर्जून अन् MI ला क्रिकेटचे धडे

त्यानंतर चौथ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी शास्त्रींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्यापाठोपाठ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांसह सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांना कोरोनाची लागण झाली. परिणामी भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा सामना रद्द झाला. बीसीसीआयची कोणतीही परवानगी न घेता कोरोना नियमाचे उल्लंघन करुन शास्त्रींचा हा कार्यक्रम पार पडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत होता. त्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावला आहे.

loading image
go to top