esakal | IPL 2021: आला रे... सचिन देणार अर्जून अन् MI ला क्रिकेटचे धडे
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin-Arjun

IPL 2021: आला रे... सचिन देणार अर्जून अन् MI ला क्रिकेटचे धडे

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई इंडियन्स आपल्या सोशल मिडियावर पोस्ट केले फोटो

IPL 2021 : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना रद्द झाला. त्यानंतर आता भारतीय खेळाडू IPL 2021साठी सज्ज होत आहेत. भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर इंग्लंडहून IPL साठी युएईला जाण्याच्या प्लॅनमध्ये बदल करण्यात आला. टीम्सने स्वत:चे खेळाडू इंग्लंडहून युएईला आणावे, असा प्लॅन दिसून आला. त्यानुसार, मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना चार्टर विमानाने युएईला आणले. त्यातच, आता मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरदेखील युएईमध्ये दाखल झाला असून प्रथमच आपला मुलगा अर्जून संघात असताना टीमला मार्गदर्शन करणार आहे.

हेही वाचा: IPL 2021: धोनीने हात दाखवताच चिमुरड्याने काय केलं पाहा (Video)

मुंबई इंडियन्सचा संघ आपल्या खेळाडूंची आणि इतर सपोर्ट स्टाफची खूप काळजी घेतो हे साऱ्यांनाच माहिती आहे. प्रत्येक खेळाडूला आणि सपोर्ट स्टाफला आपापल्या नावाची बॅग देण्यात आली आहे. त्यात आपले सामना ठेवून त्यांचा प्रवास होतो. आता नुकताच मुंबई इंडियन्सने सचिन तेंडुलकर लिहीलेल्या एका बॅगेचा फोटो पोस्ट केला आहे. सचिनचा मुलगा अर्जून तेंडुलकर सध्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहे. त्यामुळे सचिन युएईत दाखल झाल्यावर मुलगा अर्जून असलेल्या संघाला कसे मार्गदर्शन करतो, याकडे साऱ्यांचेच लक्ष असणार आहे.

हेही वाचा: IPL 2021 : मुंबई इंडियन्स फॅमिलीची खास झलक; फोटो एकदा पाहाच

दरम्यान, मुंबईच्या फ्रेंचायझीने खासगी विमानाने आपल्या खेळाडूंना युएईत आणले आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे मुंबई इंडियन्सचे खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आपल्या कुटुंबासह गेले होते. तिथून हे खेळाडू आपल्या कुटुंबासह युएईमध्ये पोहोचले. कोरोनाच्या नियमावलीनुसार, मँचेस्टरमधून निघताना आणि युएईमध्ये पोहचल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता सर्वांना ६ दिवसांचा सक्तीचा क्वारंटाइन असणार आहे. त्यानंतर सराव सत्र आणि स्पर्धेला सुरूवात होईल.

loading image
go to top