गांगुली-द्रविडने रचला डाव; शास्त्रींवर दिली 'ही' नवी जबाबदारी

वृत्तसंस्था
Friday, 1 November 2019

-  केंपेगोवडा आंतरराष्ट्रीय विमानतळापाशी 40 एकर जागेत होणार नवे NCA 
- भारताचा कर्णधार विराट कोहलीही नव्या NCA बाबत उत्सुक 
- जागा जेवढी मोठी असेल तेवढं NCA चांगलं असेल

कोलकता : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांनी भारतीय क्रिकेटमध्ये प्रशासक म्हणून एकत्र काम करण्यात सुरवात केली. या दोघांमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या कामकाजाबद्दल नुकतीच चर्चा झाली. या चर्चेनंतर दुसऱ्याच दिवशी गांगुलींनी रवी शास्त्रींना एनसीएमध्ये जबाबदारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. 

दादाचे राज असूनही द्रविडवर होणार आणखी सुनावणी

गांगुलींनी एनसीएमध्ये जाऊन बीसीसीआयचे इतर पदाधिकारी आणि राहुल द्रविड यांची भेट घेतली. त्यानंतर माहिती देताना ते म्हणाले,''ही सभा दोन तास चालली. मी द्रविडला एकट्यालाही भेटलो. आम्ही अशी एक यंत्रणा उभी करणार आहेत ज्यामुळे रवी शास्त्रींचे एनसीएमधील योगदान वाढेल. शास्त्री प्रशिक्षक असेपर्यंत त्यांनी जास्तीत जास्त वेळ एनसीएला द्यावा असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. ''

बीसीसीआय बंगळूरात एका नव्या एनसीएची उभारणी करत आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ''एनसीएमध्ये खूप काम केले जात आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीसुद्धा या नव्या एनसीएबाबत खूप उत्सुक आहे. जागा जेवढी मोठी असेल तेवढं एनसीए चांगलं असेल.''

माझं नाव घ्यायची काहीच गरज नव्हती; अनुष्का भडकल्यावर फारुखांची माफी

बीसीसीआयने देवनहालीमधील केंपेगोवडा आंतरराष्ट्रीय विमानतळापाशी 40 एकर जागा घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravi Shastri should be more involved in NCA says BCCI president Sourav Ganguly