लखनऊच्या पराभवाला शास्त्रींनी केएल राहुलला धरले जबाबदार

राहुलच्या संथ फलंदाजीमुळे सामना हातातून गेला.
KL Rahul
KL Rahulesakal

आयपीएल १५ व्या सीझनमध्ये नव्याने पदर्पण केलेला लखनौचा संघाला एलिमिनेटर सामन्यात आरसीबीकडून १४ धावांनी पराभव स्विकारावा लागला. स्पर्धेच्या सुरुवातीपासून फॉर्माचा असणारा संघ अखेरच्या क्षणी फ्लॉप ठरल्याने टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघाचा कॅप्टन के एल राहुलला जबाबदार धरलं आहे. राहुलच्या संथ फलंदाजीमुळे सामना हातातून गेला असल्याचे शास्त्री यांनी म्हटले आहे.

KL Rahul
लखनऊचं नेमकं काय चुकलं? कॅप्टन राहुलने दिले स्पष्टीकरण

एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना शास्त्री यांनी लखनऊच्या पराभवावर भाष्य केलं आहे. शास्त्री यांनी गुरुवारी आयपीएल 2022 एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध लखनौ सुपर जायंट्सच्या 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केएल राहुलच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

लखनौला पूर्वी कधीतरी आक्रमक दृष्टिकोन स्वीकारावा लागला होता, पण त्यासाठी बराच काळ वाट पाहिली. डावाच्या 9 व्या ते 14व्या षटकाच्या दरम्यान कुणीतरी आक्रमक खेळी खेळायला हवी होती. विशेषतः त्या भागीदारीच्या काळात.

जेव्हा केएल आणि हुड्डा यांची भागीदारी सुरू होती, त्या काळात केएल राहुल अधिक जोखीम पत्करू शकतो. या वेळी हुड्डा यांनी आपले काम चोख बजावले असले तरी केएल राहुल खूप थंड पडला. डावाच्या 9व्या ते 13व्या षटकांदरम्यान राहुल कोणत्याही गोलंदाजाला लक्ष्य करू शकतो. असा विश्वासही त्यांनी यावेळी दर्शवला.

KL Rahul
पराभवानंतर गौतमचे 'गंभीर मंथन', के एल राहुलची घेतली शाळा

डावाच्या मधल्या षटकांमध्ये केएल राहुलची वृत्ती अनाकलनीय होती यात शंका नाही. आणि सामना संपल्यापासून चाहते आणि इतर लोक याबद्दल बोलत होते. डी कॉकची विकेट लवकर पडल्यानंतरही, पॉवर-प्लेमध्ये केएलला झटपट धावा मिळाल्या आणि पहिल्या 6 षटकात केएलच्या 17 चेंडूत 26 धावा होत्या. पण यानंतर राहुलला पुढच्या सात षटकांत एकच चौकार लगावता आला आणि आवश्यक धावांची सरासरी झपाट्याने वाढली. लखनौला सात ते १३ षटकांत ४९ धावाच करता आल्या.

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अखेर रॉयल चॅलेंजर बेंगलोरने लखनौ सुपर जायंटचा 14 धावांनी पराभव करत आयपीएलमधून त्यांचा गाशा गुंडाळला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com