पराभवानंतर गौतमचे 'गंभीर मंथन', के एल राहुलची घेतली शाळा

आयपीएल १५ व्या सीझनमध्ये नव्याने पदर्पण केलेला लखनऊचा संघ स्पर्धेच्या अंतिम टप्प्यातून बाहेर पडला आहे.
पराभवानंतर गौतमचे 'गंभीर मंथन', के एल राहुलची घेतली शाळा
esakal

आयपीएल १५ व्या सीझनमध्ये नव्याने पदर्पण केलेला लखनऊचा संघ स्पर्धेच्या अंतिम टप्प्यातून बाहेर पडला आहे. बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने लखनऊचा १४ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर संघाचा मेंटॉर गौतम गंभीर खुपच निराश झाला. त्याने के एल राहुलला दिलेली रिअॅक्शन सध्या व्हायरल होत आहे.

पराभवानंतर गौतमचे 'गंभीर मंथन', के एल राहुलची घेतली शाळा
IPL ट्रॉफी जिंकण्याचे कोहलीचे स्वप्न पूर्ण करणार; RCB चा 'हा' खेळाडू

सामना हरल्यानंतर गौतम गंभीरने के एल राहुलची चांगलीच शाळा घेतली. सामना संपल्यानंतर गंभीर आणि के एल राहुल हे दोघे मैदानातच चर्चा करताना दिसले. त्या चर्चेदरम्यान गंभीर राहुलकडे रागाने बघत होता. त्याची रिअॅक्शन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

काल झालेल्या सामन्यात लखनऊ संघाने खुप चुका केल्या असल्याचे समोर आले. यावेळी फिल्डींग करत असताना अनेक कॅचंही सोडले गेले. तसेच, फलंदाजीत जे अपेक्षित होतं ते दिसलंच नाही. या सर्व गोष्टींबाबत गंभीरने राहुलशी चर्चा केली असल्याचा तर्क नेटकरी फोटो पाहून लावत आहेत.

पराभवानंतर गौतमचे 'गंभीर मंथन', के एल राहुलची घेतली शाळा
'मी तर 600 रन केल्या'..: लखनऊच्या पराभवानंतर केएल राहुल झाला ट्रोल

नव्याने पदार्पण केलेला संघ आयपीएल सीझन १५ च्या सुरुवातीपासून चांगवाच फॉर्मात दिसला. त्यांची खेळी पाहून ते ट्रॉफीचे चे दावेदार मानले जात होते. मात्र, अखेरच्या क्षणी बाजी पलटली. पदरी निराशा पडली.

27 मे रोजी क्वालिफायर 2 मध्ये बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या टीमची 29 मे रोजी अंतिम फेरीत गुजरात टायटन्सशी लढत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com