WTC Final 2023 : ओव्हवलवर जून मध्ये कधीच झाला नाही कसोटी सामना... कांगारूंच पारड जड?

WTC Final Ravi Shastri
WTC Final Ravi Shastri esakal

WTC Final Ravi Shastri : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू होत आहे. हा सामना ओव्हल येथे होणार असून दोन्ही संघ विजेतेपदासाठी कसून सराव करत आहेत. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा WTC च्या फायनलमध्ये पोहचला आहे. दरम्यान, इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलिया वरचढ ठरणार ही भारतीय संघ बाजी मारणार याबाबत चर्चा सुरू आहे.

याबाबत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांना भारतीय संघाचे पारडे जड वाटत आहे. भारतीय संघाने WTC Final 2023 ची चांगल्या प्रकारे तयारी केली आहे. रवी शास्त्री, रिकी पाँटिंग आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रम यांनी दोन्ही संघ आणि ओव्हलची खेळपट्टी याबाबत आपले मत व्यक्त केले.

WTC Final Ravi Shastri
Rinku Singh : 'व्यसन लागु शकते...' Shirtless रिंकू सिंहच्या फोटोवर गिलची बहिण फिदा

आयसीसीच्या एका कार्यक्रमात रवी शास्त्री म्हणाले की, 'तुम्ही वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर जर बुमराह तिथे असता तर मोहम्मद शमी, बुमराह आणि मोहम्मद सिराज असा वेगवान मारा असता. कांगारूंच्या मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स हा वेगवान माऱ्याबाबत मॅच फिटनेसची समस्या येऊ शकते.'

रवी शास्त्री पुढे म्हणाले की, 'तुम्ही मॅच खेळण्यास किती फिट आहात हा एक मोठा मुद्दा WTC Final मध्ये असणार आहे. एवढ्या मोठ्या सामन्यापूर्वी तुम्ही काही सामने खेळलेले असले पाहिजे. गोलंदाजांसाठी मैदानावर सहा तास सराव करणं आणि पाच दिवसाचा सामना खेळणं हे नेट्समध्ये दोन तास गोलंदाजी करण्यापेक्षा वेगळं असतं.

भारतासाठी मोहम्मद शमी हा फार महत्वाचा ठरू शकतो. कारण तो गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खेळत आला आहे. याबाबत बोलताना पाँटिंग म्हणाला की, 'ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी काहीही केलेलं नाही त्यांनी क्रिकेट खेळलेलं नाही. ताजेतवाने होऊन येणं हे चांगलं आहे की थोडं क्रिकेट खेळून मोठ्या सामन्याला सामोरं जाणं योग्य?'

WTC Final Ravi Shastri
French Open 2023 : बॉल गर्ल 15 मिनिटं रडली अन् खेळाडू झाले अपात्र; ग्रँडस्लॅम स्पर्धेत घडला अजब प्रकार

वसिम अक्रम याबाबत म्हणाला की एक खेळाडू म्हणून मला वाटते की तुम्ही काही सामने खेळून WTC Final ला सामोरे जोणे योग्य आहे. अक्रम ओव्हलच्या खेळपट्टीबद्दल देखील बोलला. तो म्हणाला की, 'खेळपट्टीवर चेंडूला अतिरिक्त उसळी मिळेल. ड्यूक चेंडू हा जास्त स्विंग होतो आणि कूकाबुरापेक्षा जास्त काळ तो टणक राहतो. या परिस्थितीत ऑस्ट्रेलिया किंचीत फेव्हरेट आहे.'

अक्रम पुढे म्हणाला की, 'ओव्हलवर 1880 पासून जून महिन्यात कधीही कसोटी सामना झालेला नाही. खेळपट्टी परफेक्ट असायला हवी. सामना न्यूट्रल चेंडूवर होणार आहे. मात्र ओव्हल हे कांगारूंसाठी घरच्या मैदानासारखं असणार आहे. परिस्थिती ऑस्ट्रेलियाला जास्त पोषक आहे.'

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com