Ravichandran Ashwin finally reveals the real reason behind his retirement after 8 months : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान अचानक निवृत्तीची घोषणा केली होती. त्यावेळी सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अश्विनच्या या निवृत्तीची जोरदार चर्चाही झाली होती. मात्र, आता त्याने या मागचं नेमकं कारण सांगितलं आहे. अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवरील कार्यक्रमात राहुल द्रविडशी बोलताना यासंदर्भात भाष्य केलं.